पैठण,दिं.१०(प्रतिनिधी): पैठण येथील जायकवाडी प्रकल्प नाथसागर यंदाच्या पावसाळा सत्रात भरतो का नाही अशी धाकधूक मराठवाड्यातील जनतेत होतांना दिसत होती मात्र निसर्गाच्या कृपेमुळे दि.९ सोमवारी नाथसागर धरण ९८ % टक्के भरल्यामुळे हि आनंदी वार्ता मराठवाड्यात पडताच नागरिकांनी आनंद व्यक्त केला. गोदाकाठच्या व कालव्याच्या परिसरात तसेच नाथसागराचे पाणी मिळत असलेल्या शहरातील,गावातील व औद्योगिक वसाहतीतील कारखानदारांनी आनंद उत्सव साजरा केला.
दि.९ सोमवारी नाथसागर ९८%टक्के भरल्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा खासदार संदीपान भुमरे पाटील यांचे स्विय्य सहाय्यक नामदेव खराद पाटील यांच्या सह, पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता समाधान सब्बीरवार, कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव सह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाथसागराची पुजा केल्यानंतर पाण्याचा विसर्ग १२ गेट व्दारे एकुण ६८८८ प्रति सेकंद क्युसेकने गोदावरी पात्राच्या बाहेर पाणी जाणार नाही याची दक्षता घेऊन गोदावरी पात्रता पाणी सोडण्यात आले.पुढील दोन वर्ष पुरेल एवढा पाणी साठा झाल्याने नागरीकास शेतकरी वर्गात आनंदी वातावरण निर्माण झाले आहे.
पंधराव्या शतकात श्री संत एकनाथ महाराजांच्या पैठण येथील घर वाड्यात भगवान श्रीकृष्णाने श्रीखंड या नावाने बारा वर्षे गोदावरीचे पाणी कावडीने आणुन रांजण भरण्याची सेवा बजावली हे भगवंताचे अविस्मरणीय सेवा तथा कार्य पाहुन शासनाने या धरणास नाथसागर हे नाव दिले