जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक पाच कार्यालय नुतनीकरण

0

पैठण,दिं.२५:जायकवाडी पाटबंधारे विभाग अंतर्गत असलेल्या जायकवाडी पाटबंधारे उप विभाग क्र पाच च्या कार्यालयाचे   नुतनीकरण व स्थलांतर कडा भवन येथे मंगळवार दिं.२५) रोजी करण्यात आले या नुतन कार्यालयाचे उद्घाटन जलसंपदाचे मुख्य अभियंता जयंत गवळी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कडाचे अधिक्षक अभियंता समाधान सब्बीनवार, जायकवाडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, जालना पाटबंधारे विभाग कार्यकारी अधिकारी श्रीमती कोरके,परभणी पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता श्रीमती जोशी, उपविभागीय अभियंता दिपक डोंगरे उपस्थित होते.

    जायकवाडी पाटबंधारे विभाग अंतर्गत असलेले जायकवाडी पाटबंधारे उपविभाग क्रमांक पाच चे स्थलांतरण व नूतनीकरण उपविभागाचे उपविभागीय अभियंता दीपक डोंगरे यांच्या पाठपुराव्या मुळे कडा भवन येथे झाले सदर उपविभागाची दयनीय अवस्था झालेली होती. परंतु उपविभागीय अभियंता डोंगरे यांनी सकारात्मक काम करून उपविभागात त उल्लेखनीय कामगिरी करत सन २०२२ – २३ या आर्थिक वर्षात बिगर सिंचन वसुली 44.85 कोटी रुपये तर  सिंचन वसुली 31.83 लक्ष करून उपविभाग स्तरावर उल्लेखनीय काम केले.उपविभागीय नूतनीकरण करण्यासाठी त्यांना शाखा अभियंता तुषार विसपुते, शाखा अभियंता नेहा धुळे तसेच कर्मचारी किशोर बनकर, कपिल घुसळे यांची मोलाची मदत मिळाली. सदर उपविभाग मार्फत आणखी उल्लेखनीय काम होईल अशी आशा मुख्य अभियंता जयंत गवळी यांनी व्यक्त केली.

   याप्रसंगी महाराष्ट्र राज्य सिंचन कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष गणेश सोनवणे, अभिजित कुलकर्णी, चंद्रकांत हिवाळे,शिल्पा हूलेकर,श्रीमती साखरे, सुनील घुसर, दिलीप प्रधान,राजु तुसाबड, नितीन ग्रहांचे, अप्पासाहेब ढोले, साईनाथ तिरपुडे,पी बी गायकवाड, ए बी मोगल,राजपुत सह पाटबंधारे विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here