तुलसी वनीचे झाड म्हणती !ते झाड नव्हे  विष्णूमूर्ती ॥ नाथ षष्ठीत  माउली माळेला सर्वाधिक पसंती .

0

नाथषष्ठी विशेष / गजानन पाटील

पैठण दि . :

महाराष्ट्राला मोठी साधुसंतांची परंपरा लाभलेले आहे .साधुसंताच्या पदस्पर्शाने पवित्र झालेली गोदावरीच्या पात्रामुळे सुजलम  सुफलम असलेली भूमी म्हणजे   दक्षिणकाशी म्हणून जगात ओळख असलेले श्री क्षेत्र पैठण येथील श्री संत एकनाथ महाराजांची नाथ शषष्ठी  सोहळ्याला सुरुवात झाली असून वारकऱ्यांसाठी हा मोठा आनंदाचा सोहळा असतो .लाखो वारकरी भक्त पैठण नगरीत दाखल झाले आहेत . नाथांच्या षष्ठीत शेकडो वर्षापासून दिंडीला वारीला आल्यावर  वारकऱ्याची ओळख असणारी गळ्यातील तुळशीची पवित्र  माळ खरेदी करण्याची परंपरा आजही सुरूअसल्याचे  दिसत आहे .  माळीच्या दुकाना षष्ठी साठी आलेल्या आहेत . मोठ्या प्रमाणावर वारकरी माळीची खरेदी करताना दिसून येत आहे . माळी मध्ये नवीन नवीन आकर्षक कलाकृतीच्या माळी नाथ षष्टी मध्ये बघायला मिळत असून नाथ षष्ठीला आलेला वारकरी हा नवीन माळ खरेदी केल्याशिवाय जात नाही तसेच  माऊली माळेला आज रोजी सर्वाधिक युवा वारकऱ्यांची पसंती असल्याचे सर्वदर्शनाचार्य  विठ्ठलशास्त्री  चनघटे महाराज म्हणाले .

  भारतीय संस्कृती ही निसर्ग पूजक आहे पशुपक्षी वृक्षवेली या पूज्य आहेत . तुळशीची माळ म्हणजे मांगल्याचे प्रतिक आहे . कपाळावर गोपीचंद टिळा बुक्का गळ्यात तुळशीची माळ हीच वारकऱ्याची खरी ओळख आहे .राज्यातून आलेले वारकरी या षष्ठीत नवीन माळ खरेदी करताना दिसत आहे . षष्ठीत अनेक माळ विक्री करणाऱ्याचे दुकाने आहेत . पैठणच्या नाथ षष्ठीत चार पिढ्यापासून तुळशीच्या काती माळी बनवून विक्री करणारे पंढरपूर येथील रवींद्र टमटम हा युवक नोकरीचे मागे न लागता चौथीला शाळा सोडून माळीच्या व्यवसायात उतरलेला आहे . तुळशीच्या माळा ह्या रान तुळस , रुक्मिणी तुळस , राधाकृष्ण तुळस , भगवान तुळस , कृष्ण तुळस , राधे तुळसीच्या लाकडापासून माळ बनवली जाते . एक दिवस पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशी रहाटावर  लाकूड कातून मनी बनवले जातात . माळेत  १०८ मनी व एक गुरु मणी असे १०९ मनी असतात . नाथ षष्ठी मध्ये सध्याला एक पदरी माळ  ,दोन पदरी  ,पाच पदर  , तुळशीमाळ , वैजयंतीमाळ , विठ्ठलाची माळ , श्रीराम माळ , माऊली माळ , पांडुरंग फोटो माळ  ,राधा कृष्णफोटो माळ  ,तुकाराम महाराज फोटो माळ , कातीव माळ ,जपमाळ  ,गहू माळ ,पट्टी माळ  चक्रीमाळ विक्रीसाठी असून वीस रुपयांपासून तर तीनशे रुपये पर्यंतच्या माळीच्या किमती आहेत . 

प्रतिक्रिया .

रवींद्र टमटम [ माळविक्रेते  ]माळा मोठ्या प्रमाणावर खरेदी वारकरी करीत आहेत .नोकरी लागत नाही म्हणून शिक्षण अर्ध्यावरच सोडले आणि पिढी जात परंपरागत चालू असलेला माळ बनवून विक्रीचा व्यवसाय करत असून माझी ही चौथी पिढी आहे . पंढरपूर आणि पैठणच्या नाथ षष्ठीत  सर्वाधिक माळी विकल्या जातात . वीस रुपयांपासून तीनशे रुपयांपर्यंत माळी आहेत . शासनाचे आमच्याकडे दुर्लक्ष आहे . शासनाने आमच्यासाठी एखाददे मंडळ स्थापन करून आर्थिक सहाय्य उपलब्ध करून द्यावी .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here