देशी दारू दुकान परवाना रद्द करण्यासाठी ईसारवाडी ग्रामस्थांचे आमरण उपोषण सुरू ..

0

परवाना देण्यासाठी खोटा ठराव करणाऱ्या ग्रामसेविका ,सरपंचासह इतरावर कारवाईची मागणी

पैठण (प्रतिनिधी): पैठण तालुक्यातील  ईसारवाडी ग्रामपंचायतीने कागदोपत्री बनावट विशेष ग्रामसभेचा ठराव घेऊन गावामध्ये अधिकृत देशी दारूच्या दुकानाला परवानगी ना हरकत साठी दिलेला ठराव तात्काळ रद्द करून ग्रामसेविका ,सरपंचासह इतरावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी पैठण पंचायत समिती कार्यालयासमोर ईसारवाडी येथील ग्रामस्थसह मोठ्या प्रमाणावर  महिलाचे आमरण उपोषण सोमवार दिं.२६ रोजी पासून सुरू झाले आहे .

   तर याच गावातील दुसऱ्या गटाकडून झालेली ग्रामसभा अधिकृत असून देशी दारू दुकानाकरिता दिलेली परवानगीरीतसर दिलेली आहे  त्यामुळे ना हरकत रद्द करण्यात येऊ नये यासाठी दुसरा गट ही उपोषणाला बसला आहे .दोन्ही गट आमनेसामने उपोषणाला बसल्यामुळे प्रशासनासमोर  सध्या मोठा पेच  निर्माण झाला आहे .

  ईसारवाडी ता.पैठण  येथील ग्रामपंचायत कार्यालयाने विशेष ग्रामसभा घेऊन गावात  स्थलांतरित देशी दारूच्या दुकानाला नाहरकत दिली आहे . ग्रामसेविका सह सरपंच यांनी बोगस ग्रामसभा घेतली  कोणत्याही प्रकारची ग्रामसभा झालेली नाही . दारुचे  नवीन दुकान  या परिसरात आल्यास महिला मुलींना रस्त्यावर चालणे , पाणी भरणे अवघड होणार असून तळीरामामुळे दररोज हाणामारीच्या घटना घडतील तसेच मुख्य राष्ट्रीय महामार्गावर दारूचे दुकानास परवानगी दिल्यास अपघात होण्याची शक्यता असल्याचे उपोषणकर्ते तथा सामाजिक कार्यकर्ते विजय सुते यांनी सांगितले.

  नवीन दारूच्या दुकानाला विरोध करण्यासाठी पैठण पंचायत समितीच्या कार्यालया‌ समोर दीडशे ते दोनशे महिला आमरण उपोषणाला बसलेल्या आहे . तर दुसऱ्या बाजूनेयाच गावातील दुसरा गट   देशी दारूचे दुकाना करता नाहरकत एक मताने ठराव संमत करूनच दिला  असल्याचे ग्रामपंचायत सदस्य काकासाहेब गुंड सह त्यांचे सहकारी यांचे म्हणणे आहे .

—–

ईसारवाडी गावात दारू दुकानाच्या करीता दिलेला अवैध कागदोपत्री ग्रामसभेचा ठराव रद्द करून ग्रामसेविका व सरपंच यांच्यावर कारवाई करण्यासाठी ईसारवाडी ग्रामस्थांच्या वतीने आमरण उपोषण सुरू केले आहे.दरम्यान ईसारवाडी गावात दारूची दुकान येऊ नये म्हणून शेकडो महिलांनी उपोषणस्थळी भजने म्हणाली

——-

विजय सुते उपोषण कर्ते : ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या नियमांची पायमल्ली करत ईसारवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेविका यांनी कागदोपत्री विशेष ग्रामसभा दाखवून देशी दारूच्या दुकानासाठी दिलेला ना हरकत परवाना रद्द होण्यासाठी आम्ही लोकशाही मार्गाने महिलांच्या समवेत पैठण पंचायत समितीच्या कार्यालया समोर उपोषण सुरू केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here