नाथषष्ठी निमित्ताने पायी दिंडीचे स्वागत एम आय डी सी पैठण पोलिसांनी केले.

0

पैठण,दिं.११:श्री संत एकनाथ महाराज षष्ठी निमित्ताने श्री क्षेत्र विटा ते श्री क्षेत्र पैठण पायी दिंडीचे एम आय डी सी पोलिस ठाण्याच्या वतीने स्वागत करून दिंडीतील भाविकांना नाश्ता चहा देण्यात आला दरवर्षी नाथ षष्ठी निमित्ताने याही वर्षी मोठ्या प्रमाणावर वारकरी शेकडो मैलाचा प्रवास करून नाथांच्या दर्शनाच्या ओढीने जवळ येऊन थांबले असून आज रोजी शेकडो दिंड्या एम आय डी सी पैठण परीसरात विसावलेल्या आहेत.

    यावेळी एम आय डी सी पोलिस ठाण्याच्या वतीने सपोनि भागवत नागरगोजे यांनी लांब लांबून आलेल्या विविध दिंड्यातील वारकरी यांना चहा पाणी व नाश्त्याची व्यवस्था केली आहे यामुळे वारक-यांमध्ये पोलिसांबद्दल असलेली भावना बदली आहे यावेळी दिंडी प्रमुख हभप पवन महाराज विटेकर यांचा सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे यांनी शाल श्रीफळ देऊन स्वागत केले याप्रसंगी बीट जमादार राजेश चव्हाण,कर्तारसिंग सिंगल, पत्रकार गजानन पाटील आवारे, ग्रामपंचायत सदस्य पिंपळवाडी दादासाहेब गलांडे, गोपनीय शाखेचे पोलिस कर्मचारी कृष्णा उगले, प्रभाकर सातपुते, महिला पोलिस कर्मचारी सविता रगडे सह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

——

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here