नाथसागरातुन नियोजन करुनच गोदावरी पात्रात पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी…

0

पैठण,दिं.( प्रतिनिधी ):पैठण जायकवाडी प्रकल्पाचा नाथसागर ९०%टक्क्याच्यावर भरला असुन तो १००%टक्के भरण्याकडे वाटचाल करीत आहे.हि समाधान तथा आनंददायी बातमी आहे. पैठण पासुन ते नांदेडच्या शेवटच्या हद्दीपर्यंत गोदावरी काठी परिसरात जवळपास दोनशे पारंपारिक गावे  गेल्या शेकडो वर्षापासून वसलेली आहेत.

तसेच गोदाकाठी हजारो एकर शेत जमीनी आहेत.गलथान कारभारामुळे व नियोजन न करतासन २००६ मध्ये स्थानिक जलसंपदा विभागाने अचानक पाणी सोडल्यामुळे गोदाकाठची गावे,तांडे, व  वस्त्यामध्ये पाणी शिरुन लोकांचे शेतजमीन घरांचे व रहिवाशांचे अतोनात नुकसान तथा हाल झाले होते.शेकडो एकर जमीनी वाहून गेल्या होत्या. तसेच ऐतिहासिक व प्राचीन पैठण शहरातील दुकाने व घरात १५ ते २० फुट पाणी होते.त्यावेळी गोदाकाठच्या शेकडो गावांना चांगलीच झळ सोसावी लागली. हि भयावह परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी या संकटग्रस्त गोदाकाठच्या लोकांच्या मदतीसाठी कै.लोकनेते गोपीनाथराव मुंडे व त्यांची टीम धावून आली होती. त्यामुळे 

आपतग्रस्त लोकांना,शेतकऱ्यांना त्यांनी दिलासा देऊन मदत केली होती.त्या जखमा गोदाकाठावरील  मराठवाड्यातील जनता विसरू शकलेली नाही. पावसाळी सत्रात महापुराचा फटका वेळोवेळी बसलेल्या लोकांना त्याची आठवण आजही होते.त्यामुळे

पूरनियंत्रण कायद्या अन्वये नाथसागरातुन पाणी सोडतांना पात्राबाहेर पाणी पडणार नाही असेच नियोजन करून पाणी सोडावे अशी मागणी शेतकरी संघटनेचे कैलास तवार,माऊली मुळे,राष्ट्रीय किसान परिषदेचे अध्यक्ष अशोक हुड, सामाजिक कार्यकर्ते आशिष मापारी,अशोक औटे,साईनाथ कर्डीले, विष्णू ढवळे, दिनेश पारिख,मनेश आव्हाड, गणेश भोकरे,बलभीम फलके,नाना पातकळ,प्रशांत आव्हाड आदिंनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here