नाथ षष्ठी मध्ये फडाफडात घेण्यात आले पसायदान

0

पैठण :- श्री क्षेत्र पैठण च्या दशिण काशीत श्री संत एकनाथ महाराजांच्या 424 व्या जलसमाधी पुण्यतिथी पर्वावर दिनांक 13 मार्च सोमवारी विश्व शांती प्रार्थना समितीचे मुख्य संयोजक प्राध्यापक चंद्रकात भराट यांच्या प्रमुख उपस्थितीत बाहेरील नाथ  समाधी मंदिरातील आवारात नाथभक्तांच्या उपस्थित जगात शांती होओ तसेच जगाच्या कानाकोपऱ्यात जनता जनार्दनांनी शांतमय जीवन जगत यशस्वी होओत, एकमेकांशी सोजन्याने, चांगल्या संस्काराने वागोत, राष्ट्रीय एकात्मता अखंड प्रेमपूर्वक राहोत, विश्वातील जनता जनार्दनावर कोणतेही संकट येऊ नयेत, सर्व धर्म समभाव या तत्त्वाने जीवन जगावे म्हणून प्रतिवर्षा प्रमाणे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पसायदानातुन विश्व शांती ची प्रार्थना ठरलेल्या वेळेप्रमाणे 2 वाजुन 30 मिनिटांनी यावेळी करण्यात आली.

यावेळी संस्थान श्री संत एकनाथ महाराज विश्वस्थ मंडळाचे कार्यकरी विश्वस्थ दादा बारे, नंदु काळे, उपविभागीय अधिकारी स्वप्निल मोरे, तहसीलदार शंकर लाड, विजय काकडे, प्रदीप बिलोरे, सुर्यकांत होलाने, सामाजिक कार्यकर्ते दिनेश पारीख, प्रमोद दौड, आदी उपस्थित होते. 

तीन वर्षे कोरोनाच्या थैमानामुळे नाथ षष्ठी यात्रा भरली नव्हती त्यामुळे यंदाच्या यात्रेत नाथ भक्त हिरारीने सहभागी झाले होते व त्याच्यात उत्साह तथा आनंद ओसंडून वाहत असल्याचे दिसुन येते होते. नाथ षष्ठी सोहळ्यात सहभागी झालेल्या जवळपास 500 च्या वर दिंड्या तील लाखोंच्या संख्येतील वारकर्‍यांनी विश्व शांती प्रार्थनेत पसायदान म्हणुन सहभागी झाले. 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पांडुरंग निरखे, महेश खोचे, धनराज चितलांगी, त्र्यंबक दहिफळे, कपील कावसानकर, प्रसाद खिस्ती, गणेश बांगर, रूपेश जोशी, राजु लोहिया, सतीश आंधळे, विशाल अंधारे, शहादेव लोहारे, मच्छिंद्र निवारे, मारूती वाणी, कैलास बोबडे, गजानन झोल, खंडु पवार, अमोल जाधव, विजय केसभट, शंकर शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here