नाथ षष्ठी यात्रेमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर

0

पैठण,दिं.१३:रामकृष्ण आश्रम छत्रपती संभाजी नगर च्या वतीने नाथ षष्ठी यात्रेत मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

रामकृष्ण आश्रम संभाजीनगर च्या वतीने आयोजित आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे हे दहावे वर्ष असून संभाजीनगर आश्रम प्रमुख स्वामी विष्णुपादानद , विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अक्षय पा.शिसोदे यांच्या कल्पनेतून व सहकार्याने या शिबिराचे आयोजन करण्यात येते.यात्रेत तीन दिवस संभाजी नगर येथील तज्ञ डॉकटर यांची टीम या शिबिरात सेवा देनार  असून. मोठ्या प्रमाणावर मोफत औषधी वाटप करण्यात येणार आहे ,शिबिराचा लाभ वारकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन रामकृष्ण आश्रमाच्या वतीने करण्यात आले आहे .

स्वामी विवेकानंद यांच्या मानव सेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद  आणि जण नोहे अवघा जनार्दन या दृष्टीने या आश्रमाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.गेल्या दहा वर्षात हजारो रुग्णावर उपचार व औषधी वाटप करण्यात आले आहे.

आज नाथ षष्ठी यात्रेत कै दिगंबर  कावसानकर स्टेडियमवर शिबिराचे उद्घाटन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते करण्यात आले असून या प्रसंगी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अक्षय पा शिसोदे , माजी नगराध्यक्ष सुरज लोलगे, राजेंद्र औटे, नाथ हायस्कूल चे मुख्याध्यापक श्री शंकर वाघमोडे , श्री नाथ प्राथमिक चे मुख्यध्ध्या पक संतोष खरात सुनील चितळे, खरेदी विक्री संघाचे संचालक संतोष खरात, स्वामी राजेश महाराज, या मोफत आरोग्य तपासणीला कर्जत जामखेडचे आमदार रोहितदादा पवार,  विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अक्षय शिसोदे, संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तुषार सिसोदे, चेअरमन सचिन घायाळ, माजी नगराध्यक्ष सुरज लोळगे,माजी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे, माजी नगराध्यक्ष अनिल घोडके , माजी संचालक राजेंद्र औटे, यांच्यासह श्रीनाथ हायस्कूलचे मुख्याध्यापक शंकर वाघमोडे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक संतोष खराद, अजित धस ,सुनील चितळे पवन खराद, अभय खराद , संजय भामरे,स्वामी दुर्गानंद महाराज, स्वामी चेतनानंद महाराज,डॉ.अंबुलगेकर, डॉ.शहा, डॉ. धुगे चिखलीकर सह 

शिबिरासाठी रामकृष्ण आश्रम, एम. जी एम हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर, श्रीनाथ हायस्कूल, व प्राथमिक शाळा ,मेडिकल असोसिएशन,आदींचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here