पाचोड येथे येथील शासकीय रुग्णालयाला ५० खाटाची मान्यता .

0

खासदार भुमरेच्या  प्रयत्नांना यश

पैठण,दिं.२४ : पैठण मागील अनेक वर्षापासून पाचोड तालुका पैठण येथील  रुग्णालयाला वाढीव खाटासाठी अनेक वर्षापासून खासदार तथा पालकमंत्री संदिपान भुमरे हे शासन दरबारी प्रयत्न करत होते . या प्रयत्नाला यश  मिळाले असून महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाने दि . २४रोजी पाचोड येथील ३० खाटाच्या रुग्णालयास ५०खाटाच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणिवर्धन वाढीव खाटास   विशेष बाब म्हणून शासनाने मान्यता दिली आहे . यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागला असून रुग्णांची होत असणारी हेळसांड आता थांबणार असल्याचे खासदार संदिपान भुमरे म्हणाले .

 

महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य  विभागाचे उपसचिव शि .म धुळे यांनी दि . २४रोजी पाचोड येथील ३० खाटाच्या रुग्णालयाचे ५०खाटाच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणिवर्धन करण्यास मान्यता दिली आहे .यामुळे पाचोड येथे आता ५० खाटाचे रुग्णालय आसनार  असून यामुळे येणाऱ्या काळात या ठिकाणी नवीन वैद्यकीय अधिकाऱ्यासह  कर्मचारी यांची संख्या वाढनार आहे .या रुग्णालयात अत्याधुनिक नवीन सुविधाही येणाऱ्या काळात सुरू होणार आहे . यामुळे छत्रपती संभाजी नगरला जाण्याची रुग्णाना  आवश्यकता भासणार नाही . परिसरातील हजारो नागरिकांना आता पाचोड येथेच चांगल्या दर्जाची सुविधा मिळणार असल्याचे खासदार संदिपान भुमरे म्हणाले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here