पावसाळ्यापूर्वी पैठण शहरातील मुख्य नाल्यांची साफसफाई करा

0

माजी नगरसेवक तथा गटनेता हसनोद्दीन कटयारे यांची मागणी

मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन 

——

माजी नगरसेवक तथा गटनेता हसनोद्दीन कटयारे यांची मागणीपैठण,दिं.१०( प्रतिनिधी) : नगर परिषद पैठण मार्फत दरवर्षी पावसाळ्यापूर्वी पैठण शहरातील मुख्य नाल्याची साफसफाई केली जाते. पावसाळ्यापूर्वीच नाल्यांची साफसफाई न केल्यास जोरदार पावसामुळे नाल्या तुंबून भरून पाणी साचून रहिवाशांच्या घरात व रस्त्यात पाणी साचुन नागरीकांची गैरसोय होते.यासाठी पैठण न.प. प्रशासनाने वेळीच याबाबत दखल न घेतल्यास पैठण शहर राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे  माजी नगरसेवक तथा गटनेते हसनोद्दीन कटयारे, व माजी नगरसेवक ज्ञानेश्वर घोडके, इरफान बागवान यांनी पैठण नगरपरीषदेचे मुख्याधिकारी संतोष आगळे यांना एका निवेदनाद्वारे आंदोलनचा इशारा दिला आहे

   पैठण शहरातील मुख्य नाले बसस्थानक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या पर्यंतच्या परिसरातील व तसेच भारतीय स्टेटच्या बैकेच्या पाठीमागील साठेनगर मधील मुख्य नाला रंगारहाटी, नेहरू चौक, मौलाना साहब दर्गा परिसरातील नाले ही आहेत.विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील नाल्यांची साफसफाई पूर्वी केली नसल्याने व्यापाऱ्यांच्या दुकानात नाल्यांचे तुंबलेले पाणी शिरून त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झालेल आहे. त्याची पुनरावृत्ती यावर्षी होवू नये म्हणून पैठण न.प. प्रशासन हे स्वच्छते बाबत सतत हलगर्जीपणा करत आहे. नाल्यांची साफसफाई करणे आवश्यक आहे. तसेच शहरातील स्वच्छतेबाबत देखील अनेक तक्रारी आहेत. याबाबत वर्तमानपत्रात आता पर्यंत अनेक वेळा बातम्या प्रकाशित होवून सुध्दा पैठण न.प. प्रशासनाने याबाबत काहीच दखल घेतलेली नाही.

पावसाळ्यापूर्वी वरील सर्व नाल्यांची साफसफाई करण्यात यावी न. प. प्रशासन याची दखल घेत नसेल तर जिल्हा प्रशासनाने याबाबत गंभीर दखल घेवून कार्यवाही करून पावसाळ्यात होणाऱ्या त्रासापासून शहरातील नागरिकांना मुक्त करावे  न.प. प्रशासनाने वेळीच याबाबत दखल न घेतल्यास पैठण शहर राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.असे माजी नगरसेवक तथा गटनेते हसनोद्दीन कटयारे, ज्ञानेश्वर घोडके, इरफान बागवान यांनी पैठण नगरपरीषदेचे मुख्याधिकारी संतोष आगळे यांना एका निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here