पैठण,दिं.१७.(प्रतिनिधी) : शालिवाहन राजवटीसह,प्राचीन तथा ऐतीहासीक दुर्मिळ वस्तु तथा साहित्यांचा बाळासाहेब पाटील संग्राहलयाचे उद्घाटन तात्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या हस्ते सन १९९७ मध्ये करण्यात आले होते. यावेळी मंत्री मंडळातील अनेक मंत्री हि उपस्थित होते. पैठणच्या ज्ञानेश्वर उद्यानात हे संग्राहलय उभे करण्यात आले आहे. परंतु या संग्राहलयातील संपुर्ण पुरातन वस्तु ठेवण्यासाठी संग्राहलयाच्या शेजारील संशोधण केन्द्राच्या हॉल असलेल्या दोन इमारतीहि जलसंपदा प्रशासनाने पुराण वस्तु संग्राहलयाच्या ताब्यात दिली आहेत.
हॉल मध्ये वस्तु पडुन आहेत त्याच हॉल मध्ये वस्तु मांडण्या साठी जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानी तात्काळ परवानगी द्यावी. अशी मागणी इतिहास प्रेमी व पर्यटक संघटनेचे रमेश खांडेकर,सागर पाटील,संतोश गव्हाने,प्रसाद खिस्ती,फैसल धांडे,कपील कावसानकर,मुरली साबळे,आदिनी केली आहे.
अन्ना हजारे संघटनेचे औरंगाबाद उपजिल्हाध्यक्ष विष्णु ढवळे यांनी हि प्राचीन वस्तु मांडण्यासाठी परवानगी देण्यात यावी. अशी मागणी एका निवेदनाद्वारे केली आहे. सामाजिक कार्यकर्ते दिनेश पारीख,राम तांगडे यांच्या नेतृत्वा खाली एका शिष्टमंडळाने दि.१६,मंगळवारी मराठवाडा गोदावारी विकास महामंडळाचे अधिक्षक अभियंता मनोज अवलगावकर व जयंत गवळी मुख्य प्रशासक जलसंपदा विभाग यांची भेट घेवुन बाळासाहेब पाटील वस्तु संग्राहलयातील पडुन असलेल्या प्राचीन वस्तु मांडण्यासाठी हॉल लवकरच उपलब्ध करुन देण्याची आग्रही मागणी केली आहे.