जिल्हा कृषी क्रिडा व सांस्कृतिक महोत्सव
पैठण (प्रतिनिधी): जिल्हा कृषी क्रिडा व सांस्कृतिक महोत्सव मध्ये पैठण तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील अधिकारी व कृषी सहायक यांनी सलग तीन वर्षांपासून पदक मिळविले. दरवर्षी प्रमाणे यंदाही जिल्हा कृषी क्रिडा व सांस्कृतिक महोत्सव छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आली होती यावेळी क्रिकेट,व्हाॅलीबाॅल, कबड्डी, बॅडमिंटन, शंभर व दोनशे मीटर धावणे स्पर्धा संपन्न झाल्या.
या स्पर्धेत पुरूष व महिला या दोन्ही पैठण कृषी कार्यालयातील संघांनी गोल्ड मेडल मिळवून चॅम्पियन शिप मिळविली. त्याच बरोबर सलग तीन वेळा जनरल चॅम्पियन शिपसुध्दा मिळविली आहे. सर्व वीजेत्या स्पर्धेकांचे आमदार विलास बापू भुमरे पाटील, पाचोडचे सरपंच शिवराज भुमरे पाटील, विभागीय कृषी सहसंचालक डॉ तुकाराम मोटे, जिल्हा कृषी अधीक्षक प्रकाश देशमुख, प्रकल्प संचालक आत्मा धनश्री जाधव,उप विभागीय कृषी अधिकारी अश्विनी पठारे,तालुका कृषी अधिकारी विकास पाटील यांनी अभिनंदन केले आहे.
———–
सदरील स्पर्धेत उत्कृष्ट क्रिकेट पट्टू म्हणून किशोर गायकवाड, भाऊसाहेब साबळे, नितीन हानवते, यशवंत चौधरी,राधाकृष्ण कार्ले तर शंभर व दोनशे मीटर धावणे मध्ये विकास वाघमारे, महिला मध्ये खो खो, कब्बडी, क्रिकेट बाळाबाई नजन,मेघा खोबरे,रजनी पवार,सुप्रिया पाटील,छाया अंभोरे,अपूर्वा पदमे,प्रतिक्षा दसपुते यांनी विशेष पदक मिळविले स्पर्धेचे कर्णधार म्हणून भाऊसाहेब साबळे यांनी काम पाहिले.