पैठण औद्योगिक वसाहत मधील कंपनीमध्ये लागलेल्या आगीत मशिनरीसह कच्चा माल जळून खाक

0

कोट्यावधीचे नुकसान , जीवित हानी टळली

पैठण,दिं.२७.(प्रतिनिधी): पैठण औद्योगिक वसाहत मधील सत्यहरी ऑरगनोकेम प्राइवेट लिमीटेड या कंपनीमध्ये शुक्रवार दिं.२६ रोजी मध्यरात्री ३:३० वाजेच्या सुमारास आग लागल्याने कंपनी मधील मशिनरीसह प्रयोगशाळा,कंपनीचे स्टाॅक सह अंदाजे एक ते दीड कोटींचे नुकसान झाल्याची कंपनी मधील कामगार यांनी दिली असून यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

  या बाबत घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार,पैठण औद्योगिक वसाहत परिसरातील सत्यहरी ऑरगनोकेम प्राइवेट लि.कंपनी मध्ये सौंदर्य प्रसाधने व शेतीविषयक साठी लागणारे केमिकल बनवले जातात यांचे उत्पादन तयार केले जाते.मध्यरात्री ३:३० वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किट मुळे कंपनीमध्ये आग लागली आगीचे धुराचे लोट बाहेर येत असल्यामुळे कामगारांनी व कर्मचारी यांनी पैठण एमआयडीसी अग्निशमक दलास व वाळूज एमआयडीसी अग्निशामक दलास याची माहिती दिली घटनास्थळी अग्निशमक दल व  एमआयडीसी पोलीस दाखल होत सकाळी ५.३० वाजता आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले .अडीच तासानंतर आग आटोक्यात आणली परंतु तोपर्यंत पुर्ण कंपनी चे साहित्य, मशिनरी व माल, जळाले यामुळे कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे कंपनीच्या कर्मचारी यांनी सांगितले.

याबाबत एमआयडीसी पैठण पोलिस ठाण्यात कंपनीचे सिनियर मॅनेजर जावेद रज्जाऊल्ला पठाण यांनी माहिती दिली त्यानुसार पोलीस ठाण्यात अकस्मात जळीत दाखल करण्यात आले आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संभाजीराव झिंझुर्डे, पोलिस जमादार गणेश खंडागळे, राहूल मोहोतमल, कृष्णा उगले करीत आहे.याबात भुषण शिंदे पाटील व्यवस्थापक सत्यहरी अॅरगॅनोकेम प्रा.लि.एम आय डी सी पैठण यांनी सांगितले की,सकाळी ३.५० च्या दरम्यान कंपनी मध्ये शाॅर्ट सर्किटमुळे आग लागून कंपनी मधील ग्लास लाईन रिआॅक्टर मशीनरी, इलेक्ट्रीक पॅनल बोर्ड प्रयोगशाळेचे स्टाॅक जळून  खाक झाले असून अंदाजे एक ते दिड कोटींचे नुकसान झाले आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here