———
पैठण,दिं.२२(प्रतिनिधी) : कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडुक मतदान प्रक्रिया दि.30एप्रिल रोजी पार पडली या निवडणुकीत पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या नेतृत्वाखाली १८ उमेदवार विजयी झाले. आज दि.२२ मे २०२३रोजी सकाळी १०.३० वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवड प्रक्रिया सुरू असुन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती राजु नाना भुमरे यांची पैठणच्या इतिहासात दुसऱ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली असुन उपसभापती राम एरंडे यांची निवड करण्यात आली.यावेळी अध्यासी अधिकारी तथा सहाय्यक निबंधक अनिल पुरी अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी त्यांना पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव नितीन विखे, रवींद्र बोबडे, विक्रम भुजंग, बंडू केकान यांनी साह्य केले.
फटाक्यांच्या आतिषबाजी मध्ये कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.
यावेळी संचालक शरद नरके, बद्रीनाथ बोंबले, सुभाष मुळे, गंगासागर घनवट, शशिकला हजारे, शिवाजी जाधव, साईनाथ होरकटे, सचिन मोगल, मनिषा खराद, भगवान कारके, महावीर काला, महेश मुंदडा,राजु टेकाळे, संभाजी तवार, राजेंद्र तांबे, विठ्ठल दोरखे पाटील अदि संचालक उपस्थित होते. यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख विनोद बोंबले, शिवसेना तालुकाप्रमुख अण्णासाहेब लबडे, महानंदचे राज्य संचालक नंदलाल काळे, नाथ संस्थानचे दादा पाटील बारे, रविंद्र काळे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन बाबुराव पडळे, मिठु नन्नवरे,खरेदी विक्री संघाचे संचालक भाऊसाहेब पाटील मोरे,माजी नगराध्यक्ष सोमनाथ परदेशी, गोवर्धन टाक,शेखर पाटील शिंदे,शौकत पठाण,वसंत भोसले, विजय गोरे, अमोल जाधव, नितीन एरंडे, अमोल एरंडे, नामदेव खराद, दिनेश खंडागळे,अमोल गोर्डे,विठ्ठल मुळे सह आदी उपस्थित होते.
———————-