पैठण तालुक्यातील खेर्डा येथे भगवान नृसिंह जयंती

0

पैठण ,दिं.२३.(प्रतिनिधी)खेर्डा येथील गावात पुरातन व हेमाडपंथी मंदिर असलेल्या नृसिंहनगर येथील श्री भगवान नृसिंह मंदिर मध्ये नृसिंह जयंती सोमवार रोजी मोठ्या उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली सकाळी भगवान नृसिंह यांच्या मूर्तीस ग्रामस्थांच्या वतीने दुग्धाभिषेक करण्यात आला.

   येथील श्री नृसिंह भगवान मंदिर हे पुरातन असून मंदिर हे हेमाडपंथी आहे भक्ताच्या मनोकामना पूर्ण करणारे असल्याने येथील मंदिरात नेहमी दर्शनासाठी गर्दी असते येथील मंदिर मध्ये श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळाची सांगता मंगळवार (दिं.२२) रोजी संपन्न झाली यावेळी काल्याचे किर्तन हभप विषुध्दानंद तीर्थ यांनी केले याप्रसंगी बोलताना त्यांनी सांगितले की भगवान नृसिंह हे विष्णुचे अवतार असून त्यांनी भक्तांसाठी नृसिंह यांचा अवतार घेतला असून आजही भक्ताने मनोभावे भक्ती केल्यास त्याचा प्रत्यय त्यांना येतो.

   येथील नृसिंह मंदिर परिसरात पालकमंत्री संदीपने भुमरे यांनी त्यांच्या स्थानिक निधीतून भव्य असे डोम दिल्याने येथे हजारो भाविकांना त्याचा फायदा पाऊस,ऊन ,वारा असूनही येणाऱ्या भाविकांना डोमचा फायदा झाला असल्याने भक्तांनी समाधान व्यक्त केले आहे.

    सदरील नृसिंह यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी गावातील युवक,ग्रामस्थ , ग्रामपंचायत यांनी पुढाकार घेतला होता त्यामुळे येणाऱ्या हजारो नृसिंह भक्तांना दर्शन सोयीस्कर झाले. : बाबासाहेब शिंदे (प्रगतशील शेतकरी) :

पैठण तालुक्यातील खेर्डा येथील भगवान श्री नृसिंह मंदिर हे पुरातन असून ते हेमाडपंथी आहे येथील नृसिंह भगवान हे भक्ताची मनोकामना पूर्ण करणारे असल्याने येथील मंदिरात दररोज दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते मंदिर परिसरात रोहयो तथा  पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी मोठा डोम दिल्याने भाविकांना ऊन, पाऊस यामध्ये मोठा फायदा होत असून मंदिर परिसरात आणखी विविध विकासकामे जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे पाटील यांच्या विकास निधीतून होणार असल्याने परीसराचा कायापालट होईल यामुळे ग्रामस्थासह भाविक वर्गात आनंदी वातावरण निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here