पैठण प्रतिनिधी :- श्री संत एकनाथ महाराज नाथषष्ठी निमित्ताने नाथांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी पायी दिंड्या पैठण शहरात दाखल होण्याअगोदर शहरातील सह्याद्री चौकात नगर परिषद पैठण, तहसील कार्यालय, व पोलीस प्रशासनाच्या वतीने आलेल्या पायी पालखी दिंड्या प्रमुखांचे शाल व पुष्पहार घालून त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी पैठणतहसील कार्यालयाचे तहसीलदार शंकर लाग,नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष आगळे,उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहुल,पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे, स्वच्छता निरिक्षक अश्विन गोजरे,तहसील कार्यालयाचे अव्वल कारकून बालाजी कांबळे, अव्वल कारकून रविंद्र टोनगे अदिंची उपस्थिती होती.