आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉग्रेसची पत्रकार परिषद..
पैठण प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाची पत्रकार परिषद दि. 26 गुरूवारी पक्ष श्रेष्ठीच्या सुचनेनुसार मराठवाडा ओबीसी विभाग अध्यक्ष कांचनकुमार चाटे, तालुकाध्यक्ष विनोद तांबे,शहराध्यक्ष निमेश पटेल यांच्या उपस्थितीत पार पडली. पत्रकार परिषदेत बोलताना तालुकाध्यक्ष विनोद तांबे पाटील म्हणाले की, राज्याच्या सर्वेमध्ये तीन राज्यात कॉँग्रेस पक्ष ९९% टक्क्यावर आहे. विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला ९९ टक्के जागा सुटणार असल्याची शक्यता असल्याने वरिष्ठांची चर्चा करून पक्षाच्या वतीने कॉंग्रेस पक्षाचे माजी राज्यमंत्री अनिल पटेल, मराठवाडा ओबीसी सेलचे अध्यक्ष कांचनकुमार चाटे, तालुकाध्यक्ष विनोद तांबे, प्रदेश सरचिटणीस रवींद्र काळे, दिलीप भोसले या पाच जणांनी उमेदवारी अर्ज भरण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र महाविकास आघाडी ज्या पक्षाला उमेदवारी देईल त्यांचे काम मनापासून करणार असल्याचे विनोद तांबे यांनी सांगितले.
मराठवाडा ओबीसी विभाग अध्यक्ष कांचनकुमार चाटे यांनी सांगितले की,काँग्रेसच्या काळात पैठण तालुक्याचा मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे, पक्षाचे काम पाहता पक्ष श्रेष्ठींनी आम्हाला 99 टक्के खात्रीशीर सांगितले की, पैठण विधानसभेची जागा ही काँग्रेसलाच सुटणार. तालुक्यातील घटक पक्षातील तिनही नेत्यांनी एकमेकांची टिंगल टवाळी न करता एकत्र येण्याची गरज आहे. एकोपा असल्यास नक्कीच लोकसभेप्रमाणे वातावरण राहील असे कांचनकुमार चाटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पक्षश्रेष्ठी जो उमेदवार देईल त्या उमेदवाराच्या मागे आम्ही खंबीरपणे उभा राहणार असल्याचे उत्सुक उमेदवारांनी सांगितले.
यावेळी पैठण तालुकाध्यक्ष विनोद तांबे पाटील,मराठवाडा ओबीसी सेलचे अध्यक्ष कांचनकुमार चाटे,माजी कॉँग्रेस तालुकाध्यक्ष दिलीपराव भोसले,शहराध्यक्ष निमेश पटेल, माजी सभापती मोहम्मद हनीफ,अनुसूचित जाती अनिल मगरे, युवक जिल्हाउपाध्यक्ष संभाजी काटे, आम्ले पाटील,तालुका उपाध्यक्ष बबरू कदम, युवक शहराध्यक्ष योगेश शिपनकर,माजी नगरसेवक रफीक कादरी,योगेश जोशी,अँड रमेश गव्हाणे,जिल्या उपाध्यक्ष महेश पवार,अबेद पठाण, नंदकिशोर नजन,दिलीप सवणे,आशिष पवार,रवींद्र आम्ले आदिंसह काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.