पैठण,दिं.४.(प्रतिनिधी): छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयातील बाॅब शोधक व नाशक पथकाचे पोलिस जमादार शुभम श्रीखंडे यांनी १९ वा छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र पोलिस कर्तव्य मेळावा २०२४ या स्पर्धेत रूमसर्च यामध्ये प्रथम क्रमांक पटकावून त्यांना छत्रपती संभाजीनगर जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ विनयकुमार राठोड यांच्या हस्ते गोल्ड मेडल देण्यात आले.