पैठण,दिं.२९.(प्रतिनिधी):वडवाळी येथे मधुमेह मुक्तभारतसाठी गावांसह शालेय विद्यार्थ्यांत आरोग्य जनजागृती करण्यात आली.
प्रा आ केंद्र विहामांडवा व ह्यूमना पिपल टु पिपल इंडीया संस्था अंतर्गत निरामया प्रोजेक्ट द्वारा जि प प्रशाला भागीरथी स्त्री शिक्षण विद्यामंदिर वडवाळी येथे शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती गोरे व सरपंच किशोर काळे पाटील, ग्रामपंचायत अधिकारी नामदेव दांडगे यांच्या सहभागातून ग्रामस्थासह विद्यार्थ्यांना मधुमेह आजाराबाबत माहिती देऊन जनजागृती करण्यात आली यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी गावातून मधुमेह जनजागृती बाबत रैली काढण्यात आली .
यावेळी नागरिकांना डॉ आकाश मुरमे, डॉ वैष्णवी ठाकरे वैद्यकीय अधिकारी, प्रोजेक्ट लीडर शंकरलाल गुर्जर,मनोचिकित्सक डॉ. अमिषा क्रिपलानी, आरती सुर्वे यांनी मार्गदर्शन केले यावेळी शाळेतील शिक्षक विद्यार्थी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.