महंत नामदेव शास्त्री यांचे आज हरिनाम सप्ताहात कीर्तन

0

पैठण,दिं.२४.(प्रतिनिधी) : :

श्री संत एकनाथ महाराज समाधी Sant Eknath Maharaj चतु: शतकोत्तर रौप्य महोत्सव तसेच श्री एकनाथी भागवत जयंती चतुः शतकोत्तर सुवर्ण महोत्सव निमित्त पैठण शहरात हजारो भाविकांच्या उपस्थितीत अखंड हरिनाम सप्ताह १४ वे नाथवंशज योगीराज महाराज गोसावी यांनी आयोजित केला आहे. या अखंड हरिनाम सप्ताहात राज्याच्या कानाकोपऱ्यातून साधुसंत, महंत, कीर्तनकार, प्रवचनकार येत असून या कार्यक्रमाला दररोज गर्दी होत आहे.

शुक्रवारी पैठण शहरात श्री क्षेत्र भगवान गडाचे मठाधिपती महंत हभप न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्री महाराज यांचे कीर्तन सायंकाळी ७ ते ९ या वेळेत होणार आहे. पैठण येथे सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताहाला राज्यातील भाविक मोठ्या संख्येने दररोज उपस्थिती लावत आहे. अखंड हरिनाम सप्ताहात पारायणाला प्रथमच दोन हजार भाविक बसलेले आहेत. या सप्ताहाच्या काळात दररोज महाप्रसादही सुरू आहे. कार्यक्रमाला राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील नामवंत मंडळी उपस्थित राहत असल्याची माहिती कार्यक्रमाचे आयोजक हभप योगीराज महाराज गोसावी यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here