मा. आ. शिवाजीराव काळे यांच्या पुण्यतिथी निमित्त गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचे आयोजन 

0

पैठण,दिं.२४:  पैठण तालुक्याचे माजी आक्रमक आमदार शिवाजीराव काळे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने दि.26 शुक्रवारी सकाळी 11 वाजता माहेश्वरी भक्त निवास ज्ञानेश्वर उद्यान रोड येथे तालुक्यातील 10 व 12 वी या वर्गातून विशेष गुणवत्ता मिळवून यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती शिवाजी नागरी सहकारी बँकेचे चेअरमन रवींद्र काळे यांनी दिली असुन या कार्यक्रमात तहसीलदार सारंग चव्हाण, गटविकास अधिकारी श्रीमती मनोरमा गायकवाड, पोलीस निरीक्षक संजय देशमुख आदिं मान्यवर यावेळी उपस्थित राहणार असून परभणीचे प्रसिद्ध कवी डॉ. केशव खटींग यांचे यावेळी तरुणाईवर व्याख्यान होणार आहे.

परभणी येथील प्रसिध्द कवी केशव खटींग यांच्या उपस्थितीत गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक व प्राचार्य/मुख्याध्यापक यांचा सामुहिक सत्कार करावयाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमास विद्यार्थी, पालकांनी उपस्थित राहावे असे आवाहन बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी इ.आय. पठाण, व्हा.चेअरमन भाऊसाहेब औटे, व्यवस्थापक संतोष राऊत पाटील यांच्यासह संचालक मंडळाने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here