मुधलवाडी येथे नेत्र तपासणी शिबीर संपन्न

0

पैठण,दिं.७.(प्रतिनिधी) : पैठण तालुक्यातील मुधलवाडी येथे नवरात्र निमित्ताने गावातील नागरीकांसाठी भव्य नेत्र तपासणी शिबीर घेण्यात आले याप्रसंगी ७० पुरुष व महिलांनी नेत्र तपासणी करून ज्यांना चष्माचा नंबर लागला अशांना मोफत चष्मे वाटप मुधलवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच मनिषा भरत मुकुटमल यांच्या हस्ते करण्यात आले.

   

यावेळी नेत्र चिकित्सक डॉ रेखा मोरे, निखिल भारती यांनी रुग्णांची नेत्र तपासणी केली याप्रसंगी ग्रामपंचायत अधिकारी राधाकृष्ण चौधरी पाटील, उपसरपंच सोनाली ढाकणे,माजी सरपंच काकासाहेब बर्वे,भरत मुकुटमल ,कैलास मदन,लाला कुरेशी,दिपक गव्हाणे,सोनू पोकळे,लाला जाधव, सुशिल बोडखे पाटील, शिवाजी जाधव, सतिश लबडे, विक्रम आढाव, सुरेश शिंदे, रघुनाथ डाके सह आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here