सौ.स्वाती किशोर काळे जनतेतून सरपंच पदी विजयी.
पैठण,दि.६.( प्रतिनिधी)
पैठण तालुक्यातील वडवाळी गावाची आगळी वेगळी ओळख असून प्रत्येक पक्षाचे दिग्गज नेते असलेलं गांव म्हणजे वडवाळी, तसेच संवेदनशील ग्रामपंचायत म्हणजे वडवाळी अशी गावची ओळख असून, नुकतीच या वडवाळी गावची ग्रामपंचायत निवडणूक संपन्न झाली असून गावाचा उत्सव बालाजी लळीत आणि ग्रामपंचायत निवडणूक सोबतच झाल्याने गावात निवडणूकिचे वारे जोमात होते.
या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भाजपचे तालुकध्यक्ष लक्ष्मण औटे, ठाकरे गटाचे उपतालुका प्रमुख परसराम खोपडे यांचा संयुक्त पॅनल श्री लक्ष्मीबालाजी ग्रामविकास परिवर्तन पॅनल, व शिंदे गटाचे छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान पाटील भुमरे यांचे कट्टर समर्थक राज्य दूध संघाचे संचालक नंदलाल काळे यांचा श्री शिवबालाजी ग्रामविकास पॅनल असे दिग्गज पॅनल मध्ये चूरशीची लढत झाली.
अत्यंत चूरशीच्या या ग्रामपंचायत निवडणूकित पालकमंत्री भुमरे यांचे समर्थक राज्य दूध संघाचे संचालक नंदु आण्णा काळे पाटील यांच्या पॅनलच्या सरपंच पदाचे उमेदवार सौ.स्वाती किशोर काळे यांनी विरोधी उमेदवारावर ६८ मतांनी मात करत दणदणीत विजय मिळवला.
या विजयाबद्दल छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान पाटील भुमरे , शिवसेना युवानेते तथा चेअरमन विलास बापू भुमरे यांनी सरपंच पदी निवड झाल्याबद्दल सौ. स्वाती किशोर काळे यांना शुभेच्छा दिल्या. या श्री शिवबालाजी पॅनल चे विजयी उमेदवार सौ. स्वाती किशोर काळे जनतेतून सरपंच पदी विजयी, तर सदस्य पदी मंगल अशोक पाचे, गणेश आण्णासाहेब घोंगडे, प्रियंका मनोहर जाधव, गणेश तुकाराम शिंदे, प्रभाकर रख्माजी पाचे, रितू विजय गायकवाड आदीं उमेदवारांचा विजय झाला आहे.
राज्य दुध संघाचे संचालक नंदू आण्णा काळे पाटील, माजी सरपंच उत्तमराव जाधव, माजी सरपंच सखाराम शिंदे, अरुण पा. काळे, अशोकदादा बर्डे, संताराम जाधव, सुदाम पाचे आदी नेत्यांच्या नेतृत्वाखाली श्री शिवबालाजी ग्रामविकास पॅनल ग्रामपंचायत निवडणूकीच्या मैदानात उतरले होते.
वडवाळी ग्रामस्थांनी भरभरून मताधिक्याने निवडून दिल्याबद्दल समस्त गावकऱ्यांचे किशोर संतराम काळे, शिवसेना युवानेते शाम नंदलाल काळे व काळे परिवार यांच्या सह पॅनलच्या विजयासाठी परिश्रम घेणारे मित्र परिवार यांचे आभार मानले आहे.