पैठण,दिं.७.(प्रतिनिधी): ‘आपल्या आयुष्याचा आलेख उंचावत सन्मानाने उभं रहायचं असेल तर विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम करावे लागतील. महाविद्यालयातील तज्ञ प्राध्यापकांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा फायदा करून घ्यायचा असेल आणि सर्वसंपन्न व्हायचं असेल तर त्यांची वर्गातील नियमीत उपस्थिती हाच एकमेव पर्याय आहे!’ असे मत पैठण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी व्यक्त केले. ते प्रतिष्ठान महाविद्यालयात संपन्न झालेल्या विद्यार्थी – पालक मेळाव्यात बोलत होते. विद्यार्थ्यांच्या नियमित उपस्थितीबाबत पालकांनीही जागरूक रहावं असं ते म्हणाले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस जी. सोनकांबळे यांनी या मेळाव्यात उपस्थित असलेल्या ११ वी, १२वी ते बी.ए. बीएस्सी, बी.कॉम चे ४५० विद्यार्थी आणि १५० पालकांना शुभेच्छा देत महाविद्यालयात नियमित येण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील तज्ञ प्राध्यापकांनी मार्गदर्शन करत महाविद्यालयातील वेगवेगळया विभागातील सुविधा आणि योजनांची माहिती देत त्यांनीे पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत त्यांच्या शंकाचे समाधान केले.
या मेळाव्याचे सुत्रसंचलन डॉ. हंसराज जाधव यांनी तर आभार डॉ. वसंत झेॆडे यांनी मानले. मेळाव्याच्या यशस्वितेसाठी संयोजन समितीतील डॉ. शोभा मद्रेवार, डॉ. ममताराम करे, डॉ. मनिषा काळे, डॉ. दिपक भुसारे, डॉ. अर्जुन मोरे, डॉ. प्रभाकर कुटे, प्रा.वैजनाथ चाटे, प्रा. विश्वास गव्हाणे, इम्रान पठाण, रुपेकर, हिवराळे, बागुल यांच्यासह प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी यांनी प्रयत्न केले.