पैठण,दिं.३१.(प्रतिनिधी): शिवाजी नागरी सहकारी बँकेच्या चेअरमन व व्हा.चेअरमन पदाची निवडणूक बुधवार दिं.३१ रोजी निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पुरी यांच्या अध्यक्षतेखाली बिनविरोध पार पडली. यावेळी चेअरमनपदी सलग तिसऱ्यांदा रवींद्र शिवाजीराव काळे पाटील यांची तर व्हाईसचेअरमन पदी भाऊसाहेब बापूसाहेब औटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी नवनियुक्त संचालक यांचा सत्कार करण्यात आला. हरिपंडित रंगनाथबुवा गोसावी,रामचंद्र शिवाजीराव काळे, पाशा अब्दुल रहेमान धांडे, शंकरराव ज्ञानदेव राऊत,अशोक श्रीकिसन जाधव ,अरुण केशवराव नरवडे,शामकुमार मदनलाल लोहिया,राजेंद्र उत्तमराव टेकाळे, सौ.तनुजा सोमनाथ जाधव,सौ.सुनीता सुनील जाधव,कारभारी देवराव लोहकरे, दशरथ आसाराम सोनवणे, पृथ्वीराज लहरसिंग चौहान यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ई आय पठाण, जी.व्ही .म्हस्के, संतोष पाटील राऊत,नरसिग् लोहिया बाळू राऊत,कारभारी सोनवणे, अप्पासाहेब मिसाळ, बाप्पासाहेब सोनवणे,किशोर वैद्य,याकूब पठाण, विठ्ठल तळपे, आदी उपस्थित होते.