शिवाजी बँकेच्या वतीने पैठण तालुक्यातील 10 व 12 वी च्या गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार

0

पैठण,दिं.२६.(प्रतिनिधी) : पैठण तालुक्याचे माजी आमदार तथा संस्थापक अध्यक्ष शिवाजी नागरी बँक पैठणचे स्व.शिवाजीराव काळे यांच्या स्मृतिदिना निमित्त शिवाजी बँकेच्या वतीने पैठण तालुक्यातील 10 व 12 वी च्या गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार आज महेशवरी भक्त निवास येथे बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिवाजीराव काळे यांच्या अध्यक्ष ते खाली पार पडला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पैठणचे तहसीलदार सारंग चव्हाण ,पोलिस निरीक्षक संजयजी देशमुख,पंचायत समितीचे विस्तार अधिकारी प्रकाश लोंढे तसेच या कार्यकामास परभणी येथील  प्रख्यात कवी डॉ. केशवजी कवी यांचे व्याख्यान झाले .यावेळी बँकेच्या वतीने वडजी येथील अनाथ असलेली कु.अश्विनी नारायण गोजरे या विद्यार्थनीचे भविष्यकाळातील संपूर्ण शिक्षणा ची हमी व बँके घेत असलेची हमी रवींद्र काळे यांनी घेतली. अहवाल सालात बँकेचे अधिकारी/कर्मचारी यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल बँकेच्या संचालक मंडळ  वतीने सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी व्हा.चेअरमन भाऊसाहेब औटे,हरिपंडित गोसावी, पाशा,धाडें, रामचंद्र काळे,शंकररावं राऊत,अशोक जाधव,दशरथ सोनवणे, पृथ्वीराज चव्हाण,शाम लोहिया,सोमनाथ जाधव,अरुण नरवडे,कारभारी लोहकरे,राजेंद्र धरपळेया कार्यक्रमास प्रा.संतोष तांबे, बाबा राऊत ,सुदामराव वाबळे,फाजलं टेकडी,गोवर्धन टाक,यशवंत काळे,कल्याण म्हस्के,बदामराव तौर,प्रकाश निवारे , नामदेव मगरे,मित्रवर्धन काळे,उदयसेन काळे,भाऊसाहेब पिसे, व्यकट मुंडे,संभाजी गव्हाणे ,सुरेश शेळके,बाळासाहेब खुळे,गणेश पवार,किसनराव धरपले,दत्ता फासाटे आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करणेसाठी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ई आय पठाण व उप मुख्य कार्यकारी अधिकारी जी.व्ही म्हस्के, व्यवस्थापक संतोष राऊत पाटील यांच्या मार्ग दर्शनाखाली सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संतोष गव्हाणे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन उप मुख्य कार्यकारी अधिकारी गणपत् म्हस्के यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here