श्री क्षेत्र मुर्डेश्वर ता.सिल्लोड ते पंढरपुर पायी दिंडी क्रं.१२ चे स्वागत

0

पैठण,(प्रतिनिधी):श्री संत शांतीब्रह्म एकनाथ महाराज पालखी सोहळा श्री क्षेत्र पैठण ते पंढरपुर समवेत श्री क्षेत्र मुर्डेश्वर ता.सिल्लोड  ते पंढरपुर पायी दिंडी क्रं.१२ चे पिंपळवाडी पिराची परीसरात मोठ्या उत्साहात दारोदारी रांगोळी काढून स्वागत करण्यात आले.

  श्रीक्षेत्र मुर्डेश्वर ते पंढरपूर या पायी दिंडीच्या पालखी रथाचे पिंपळवाडी परिसरात शुक्रवार (दिं.२८) रोजी ठिकठिकाणी रस्त्यावर रांगोळी काढून स्वागत करण्यात आले. ‘भानुदास- एकनाथ’च्या गजराने पिंपळवाडी परिसर दुमदुमून गेला होता 

  श्री क्षेत्र मुर्डेश्वर ते पंढरपूर ही पायी दिंडी दरवर्षी ठिकठिकाणी मुक्काम करत पिंपळवाडी येथे  पोचली. या पायी दिंडीचे हे १२ वे वर्ष असून यावेळी श्री मुर्डेश्वर संस्थानचे मठाधिपती महंत ओंकार गिरी महाराज यांचेस्वागत बबन तागड, प्रयागाबाई तागड, भाऊसाहेब तागड यांनी केले. यावेळी बद्रीनाथ पाटील, शेषराव महाराज,रघुनाथ शेळके , अरूण देऊळगावकर, दिनकर चव्हाण,उमाकांत सोळंके, संतोष गवळी,लहू गायकवाड सह वारकरी , भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here