श्री चांगदेव विद्यालयाचा गुणगौरव पुरस्कार सोहळा संपन्न 

0

पैठण,दिं.२४.(प्रतिनिधी):पैठण तालुक्यातील श्री चांगदेव विद्यालय चांगतपुरी प्रशालेच्या शालांत प्रमाणपत्र परीक्षा देणाऱ्या एस.एस.सी.च्या विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने गुणगौरव सत्कार सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाचे औचित्य साधून विविध उच्च पदावर निवड झालेल्या यशवंत गुणवंत माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. 

   गुणवंत विद्यार्थी कु. वैष्णवी बाळासाहेब शिंदे, रेश्मा खरात,साक्षी भवार यांच्यासह आदीं विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला तसेच शाळेतील विद्यार्थी विविध उच्च पदावर निवड झालेल्या यशवंत गुणवंतांच्या सोहळ्यांचेही आयोजन करण्यात आलं होतं, यामध्ये गणेश नाटकर, जालिंदर नाटकर, जगदीश खरात, अविनाश वडघने, हरी नाटकर, संदिपान नाटकर, दादासाहेब नलभे, प्रवीण खेडकर, प्रतीक्षा पाखरे, विठाबाई नाटकर, अश्विनी नाटकर, मुक्ता बनगर, पूजा झारगड सह आदिंचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक शिवाजी पवार यांनी केले.यावेळी सरपंच साईनाथ व्होरकटे, संस्थेचे अध्यक्ष रामनाथ चोरमले, सचिव सुधीर चोरमले, वैजिनाथ मदने, पोलीस पाटील जगन्नाथ माने, भागिनाथ नाटकर, नितीन मोरे, उपसरपंच शरद झारगड, केंद्रप्रमुख उत्तम खरात, दिलीप थोटे, सुभाष शिंदे, शेषराव नलभे, श्री निवारे, उत्तमराव नलभे, बाळासाहेब तट्टू, बाबासाहेब व्होरकटे संभाजी वडघणे, चंद्रकांत खरात, राणी शिंदे, सरपंच शिवानी पाखरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, पंचकृषीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन नानासाहेब राख यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here