इतर कारखान्याच्या बरोबरीने उसाला भाव देणार – विलास भुमरे
पैठण ,दिं.५.(प्रतिनिधी) : पैठण तालुक्यातील श्रीक्षेत्र चोंढाळा येथील श्री रेणुकादेवी शरद सहकारी साखर कारखान्याच्या २०२३-२४ च्या आठव्या गळीत हंगामाचा मोळी टाकून शुभारंभ करून गाळपात सुरुवात करण्यात आला.
दि. ५ रोजी दुपारी ३ वाजता रेणुका मातेच्या प्रतिमेचे पूजन विधिवत पूजन करुण कारखान्याचे चेअरमन विलास बापु भुमरे व संचालक मंडळ यांच्या शुभास्ते संपन्न झाला. त्याचप्रमाणे ऊस वाहतूक दार व बागायतदार यांचा सत्कार करण्यात आला.
यावर्षी दोन लाख मे टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे.यावेळी चेअरमन विलास भुमरे बोलतांना म्हणाले जिल्ह्यातील छत्रपती संभाजी राजे शुगर,मुक्तेश्वर शुगर या कारखान्याच्या बरोबरीने ऊसाला भाव देनार असे म्हणाले. त्याच प्रमाणे यंदा अत्यल्प प्रजन्यवृष्टीमुळे कारखाना कार्यक्षेत्र ऊसाचे घटले आहे. त्यामुळे उसाचा तुटवडा जाणवणार आहे. मागील चार हंगाम रोहयो तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना कार्यक्षेत्रात अतिरिक्त ऊस असताना व अडचणीच्या काळात आपल्या कारखान्याने सभासद व शेतकऱ्यांना आधार देऊन कार्यक्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांना चांगला भाव देवून उसाचा वेळेत देयके अदा केले. आपल्या कारखान्यास कसलेही प्रकारचे पदार्थ निर्मिती नसताना देखील इतर कारखान्याच्या बरोबरीने भाव देणार असल्याचे सांगितले. व सभासद शेतकऱ्यांनी श्री रेणुका देवी शरद कारखान्यास प्राधान्याने उस द्यावा असे आव्हान केले. यावेळी पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजू नाना भूमरे,
रेणुका देवी शुगर मिलचे दत्तात्रय रेवडकर,रोहिदास रेवडकर,मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव बावडकर, विरेंद्र गर्जे,श्रीमंत पाटील टेकाळे सह संचालक नितीन तांबे , चंद्रकांत गवांदे,लक्ष्मण डांगे,विष्णू नवथर,भीमराव वाकडे,दिलीप बोडखे,अफसर शेख,सुभाष गोजरे, सुभाष चावरे,भरत तवार,नाना गाभूड,ज्ञानदेव बडे,संदीपान काकडे,ब्रह्मदेव नरके, यांच्या सह पैठण खरेदी विक्री संघाचे चेअरमन बाबुराव पडूळे,रावसाहेब घावट,मुकेश काला, संतोष तांबे,लहू डुकरे, बप्पा येळे,सुनील डूकरे, गणेश भाकरे, शकील शेख, पंडित धायकर, राजेंद्र नरवडे, दीपक गाभुड, संपत गाधले, सतीश आंधळे, सीताराम काकडे, यांच्या सह कारखान्याचे खाते प्रमुख, सभासद, शेतकरी,कामगार, ऊस तोडणी मुकादम यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.