श्री संत एकनाथ महाराज पालखीचे भक्तिमय वातावरणात पंढरपूरकडे प्रस्थान 

0

पैठण,दिं.२८(प्रतिनिधी): श्री संत एकनाथ महाराज यांच्या पालखीचे शुक्रवारी सायंकाळी भक्तिमय वातावरणात पंढरपूरकडे प्रस्थान झाले. हरिनामाचा जयघोष, टाळ मृदंगाच्या गजरामुळे भक्तिमय बनलेल्या वातावरणात संत एकनाथ महाराज यांच्या पालखीचे पंढरपूर कडे प्रस्थान केले. 19 दिवसाच्या खडतर प्रवासानंतर नाथांची पालखी पंढरपूरला पोहचणार आहे.

    शुक्रवारी सकाळी, गावातील नाथमंदिरात संत एकनाथ महाराज यांच्या पालखीला सजवून व विधिवत पूजन करून पालखीत नाथांच्या पादुका ठेवण्यात आल्या. नाथांच्या पालखीची गावातील नाथमंदिरापासून समाधी मंदिरापर्यंत पायी मिरवणूक काढण्यात आली व समाधी मंदिरात ही पालखी भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आली. संध्याकाळी ठीक चार वाजता नाथांची पालखी गागा भट्ट चौकातील पालखी ओट्यावर वारकरी, भाविक व गावातील नागरिकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आली. दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती. ऐन सूर्यास्ताच्या वेळेस व हजारो भाविक, वारकरी व पैठण शहरातील नागरिकांच्या उपस्थितीत नाथांची पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान केले.

     19 दिवसाच्या प्रवासानंतर व  मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र या भागातील एकोनाविस गावामध्ये मुक्काम केल्यावर 16 जुलै ला संत एकनाथ महाराज यांची पालखी पंढरपूरला पोहचेल. संत एकनाथ महाराज यांच्या पालखीचे मार्गक्रमण या प्रमाणे असेन चनकवाडी, हादगाव, लाडजळगाव, कुंडल पारगाव, मुंगुसवाडां, राक्षसभुवन, रायमोह, पाटोदा, दिघोळ, खेर्डा, दांडेगाव, अनाले, परंडा, बिटरगाव, कुर्डू, अरण, करकंब, होळे, शिरढोण मार्गे आठ जुलैलां  संत एकनाथांची पालखी पंढरपूर येथे पोहचेन.  आषाढी वारीत महोत्सवात सहभागी झाल्यावर 20 जुलै पर्यंत पालखीचा मुक्काम पंढरपूरच्या नाथ मंदिरात राहील यावेळी नाथवंशज रघुनाथ महाराज पालखीवाले, योगेश महाराज गोसावी,जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती विलास बापू भुमरे पाटील, माजी नगराध्यक्ष सोमनाथ परदेशी, विष्णू खंडागळे,किरण जाधव, प्रशांत जगदाळे, नामदेव खराद सह आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here