संत एकनाथ कारखान्याच्या निवडणुकीत सहा संचालक बिनविरोध .

0

१५जागेसाठी २७ उमेदवार रिंगणात .

पैठण दि .३०.(प्रतिनिधी): पैठण तालुक्याचे अर्थकारण, राजकारणाचे केंद्रबिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याकडे बघितले जाते . सदरील कारखाना हा भाडेतत्त्वावर सचिन घायाळ  शुगर लिमिटेड यांना चालवायला दिलेला आहे . या कारखान्याची पंचवार्षिक २१ संचालकासाठी  निवडणूक सुरू असून सोमवार दि . २९ रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ७५ अर्जापैकी ४२ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असून शेतकरी विकास पॅनलचे पाचोड  ,बिडकीन गटातून सहा उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचे सचिन घायाळ म्हणाले . १५ जागेसाठी २७उमेदवार रिंगणात आहे .

संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक  २१ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. सचिन घायाळ यांच्या नेतृत्वाखालील “संत एकनाथ शेतकरी विकास पॅनलचे सहा  उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. बिडकीन गटातून दत्तात्रय आम्ले, दिगंबर गोर्डे  , दीपक फांदाडे तर  पाचोड गटातून विक्रम घायाळ, भरत घायाळ , गणेश घायाळ बिनविरोध निवडून आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी संतोष बिडवई यांनी सांगितले .चेअरमन शिसोदे आणि घायाळ यांनी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले . मात्र माजी आमदार संजय वाघचौरे यांनी काही ठिकाणी उमेदवार निवडणुकीत उतरल्यामुळे ही निवडणूक संपन्न होत आहे . यावेळी संस्थापक कै .पंढरीनाथ पाटील शिसोदे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला . बिनविरोध निवडून आलेल्या संचालकाचा युवानेते  सचिन घायाळ ,अक्षय शिसोदे , तुषार शिसोदे  यांनी स्वागत केले .यावेळी प्रल्हाद औटे , आबासाहेब  मोरे  ,गणेश पवार , सुनिल चितळे  , अमोल घायाळ  अनिल रोडे,अॅड रविंद्र घायाळ सह आदी उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here