छ.संभाजीनगर :- बहुजनांचा प्रजाहितदक्ष,दानशूर राजा सम्राट बळीराजा यांच्या स्मरणार्थ सत्यशोधक समाज संघ,छ.संभाजीनगरच्या वतीने क्रांती चौक येथे दिनांक ०२ नोव्हेंबर २०२४ रोजी सम्राट बळीराजाचा सत्य इतिहास मांडणारी गौरव सभा घेण्यात आली.
सर्वप्रथम सम्राट बळीराजा यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्प अर्पण करण्यात आले.सार्वजनिक सत्यधर्म विधी कर्ते साळूबा पांडव यांनी खंडोबाचा तळ भंडार हा विधि संजय तांबे,विजय महाजन,विष्णू वखरे,हरदास वाघ,जनार्दन कापुरे,सुभाष गांगुर्डे,प्राक्तन पांडव,डॉ.अनिल धुळे,वैभव मराठे,संदेश जाधव यांच्याकडून करून घेतला.सार्वजनिक सत्यधर्माच्या प्रार्थनेचे सामुदायिक गायन घेण्यात आले.याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून बोलताना प्रा.डॉ.प्रल्हाद लुलेकर यांनी सम्राट बळीराजांच्या प्रजाहितदक्ष कार्याची माहिती सांगून बळीराजाची थोरवी विशद केली.
या कार्यक्रमाचे आयोजक अविनाश खैरनार यांनी बळीराजाचा वारसा पुढे चालविण्यासाठी सामाजिक एकतेचे महत्त्व सांगितले.या गौरव सोहळ्यासाठी अभय टाकसाळ,मिर्झा कय्युम नकवी, उज्वलकुमार म्हस्के,बाळासाहेब गरुड,सतीश इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निकिता जाधव, प्रास्ताविक …… खोबरे यांनी तर आभार प्रदर्शन सरस्वती हरकळ यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भाऊसाहेब जाधव,विजय काकडे,अनिता देवतकर, आतिश कळवणकर,कल्याण रंधे, विजय तांबे,वेदांत तांबे,बाबासाहेब राऊत,अर्चना तांबे,कृतिका तांबे,संध्या जाधव डॉ.सुनील धुळ, एन.आर.काळे यांनी परिश्रम घेतले.