सिमेवर असलेल्या अहमदनगर व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातुन येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी

0

पैठण,दिं.१२.(प्रतिनिधी): विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दोन जिल्ह्याच्या सिमेवर असलेल्या अहमदनगर व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातुन येणाऱ्या वाहनांची खुले जिल्हा कारागृह परीसरात असलेल्या नाकाबंदी पथकाकडून कसून तपासणी करण्यात येत आहे.

     पैठण विधानसभा २०२४ अंतर्गत पैठण मतदार संघामध्ये निवडणूक शांततेत पार पडण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासन व पैठण तालुका प्रशासन यांच्या वतीने तालुक्यांमध्ये ठिकठिकाणी स्थिर पथके व भरारी पथके तैनात करण्यात आलेली असून पैठण शेवगाव रस्त्यावरील खुले जिल्हा कारागृह परीसरात नाकाबंदी चौकी असून त्या ठिकाणी चोवीस तास बैठक पथकाद्वारे वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.

यामध्ये अवैध दारू,पैसा तसेच मतदारांना प्रलोभने दाखविण्याच्या अनुषंगाने केली जाणारी वाहतूक यावर येथे कठोर कारवाई करण्यात येत असून दररोज २०० ते ३०० वाहने तपासणी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी निलम बाफमा, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सारंग चव्हाण,आचार संहिता पथक प्रमुख तथा पैठण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संतोष आगळे, पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी मनोरमा गायकवाड, सहाय्यक गटविकास अधिकारी राजेश कांबळे, किशोर निकम, ईश्वर सोमवंशी यांच्या नियंत्रणाखाली सुरू आहे.

   

छत्रपती संभाजीनगर व अहमदनगर या दोन जिल्ह्यांतील येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची येथे कसून तपासणी जिल्हा नाकाबंदी या ठिकाणी स्थिर पथक व भरारी पथक पैठण यांच्या कडून संयुक्त सुरू आहे  यावेळी पैठण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिध्देश्वर गोरे,भरारी पथक प्रमुख रमेश आघाव, स्थिर पथक प्रमुख प्रशांत पाटील , नितीन हूगे, विनायक इंगोले,नामदेव दांडगे, राजेश कावसानकर, संदीप घालमे,पोलीस कर्मचारी गणेश फरताळे, समाधान भागिले, अविनाश शिंदे, अरविंद थोरात  , मुकुंद तुरूप, मोरेश्वर बेलदार, अमोल मिसाळ सह  व्हिडिओग्राफर सह कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here