११ जुलै : जागतिक लोकसंख्या दिन

0

दरवर्षी ११ जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो . ११ जुलै १९८७ रोजी जगाने पाच अब्ज लोकसंख्येचा आकडा पार केल्यामुळे १९८९ पासून हा दिवस साजरा केला जातो . लोकांमध्ये कुटुंबनियोजन, लिंग समानता, दारिद्र्य, मातृ स्वास्थ्य, मानवी हक्कांबाबत जागरूकता निर्माण करणे हे हा दिवस साजरा करण्याचे उद्दिष्ट आहे . 

   २०११ मधील लोकसंख्या आकडेवारी विचारात घेता भारताचा जगामध्ये लोकसंख्येच्या बाबतीत दुसरा क्रमांक होता . भारताचे एकूण लोकसंख्या १२१.०८ कोटी होती आणि ही लोकसंख्या जगाच्या एकूण लोकसंख्येच्या १७.५ टक्के होती . आज जगात भारताची सर्वाधिक म्हणजे १२१. ७२ कोटी इतकी लोकसंख्या आहे तर जागतिक लोकसंख्येने ८०० कोटीचा आकडा पार केला आहे .

१. अन्नधान्याचा तुटवडा – कुटुंबांमध्ये जास्त माणसे वाढली तर सर्वांना नीट आहार देणे अशक्य होते . कारण त्यावर खर्च जास्त होतो. उत्पन्न कमी व त्यामुळे महागाई वाढते . दुष्काळ पडला तर अन्नधान्य महाग होते व त्याचा पुरवठा करणे शासनाला देखील कठीण जाते . त्याचप्रमाणे पिण्याच्या पाण्याची टंचाई , शेतीसाठी लागणा-या पाण्याची टंचाई तसेच पाणी अनेक कारणांसाठी वापरावे लागते . त्यामध्ये जर दुष्काळ पडला तर पाणी मिळत नाही . त्यामुळे शेतीला पाणी देता येत नाही व अन्न धान्य मोठया प्रमाणावर म्हणजेच लोकसंख्येच्या प्रमाणत पिकविता येत नाही त्यामुळे महागाई वाढते व कुटुंबाला पुरेसा आहार मिळणे कठीण होते व यामधूनच कुपोषणाचे प्रमाण वाढते व अनेक रोग आजारांना सामोरे जावे लागते.

२. अपुरा निवारा –  जर कुटुंबात ठरावीक माणसे राहत असतील तर त्यांना ते घर राहण्यास पुरते . परंतु त्याच कुटुंबात अनेक सदस्य वाढले तर ते घर अपुरे पडते व दुसरे बांधावे लागते . जरी जास्त घरे बांधली तरी जमीन वाढत नाही. त्याचा परिणाम अन्नधान्य पिकविण्यावर होते.

३. दळणवळण, शैक्षणिक, आरोग्य सुविधा यांचा अभाव – लोकसंख्या वाढल्यामुळे प्रवासाच्या ज्या सुविधा आहेत त्या अपु-या पडतात. तसेच अपघातांचे प्रमाण वाढते . 

४. जंगलतोड – जळणासाठी लाकूड, घरबांधणी / फर्निचर यासाठी माणसाने जंगलतोड केली. लोकसंख्या वाढीचा परिणाम निसर्गावर झाल्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले . 

५. स्थलांतर – नोकरी व्यवसायाच्या शोधार्थ होणा-या स्थलांतरामुळे शहरांची झपाटयाने वाढ होते व शहराच्या सर्व यंत्रणांवर ताण पडू लागतो . कारखान्याच्या धुराने, घाण पाणी नदीमध्ये सोडल्याने पाणी दूषित होते . वाहनामुळे हवा प्रदूषण होते .

६. साधनसंपत्ती व उर्जेची कमतरता भासते .

७. गुन्हेगारीचे वाढते प्रमाण – शिक्षण जरी मिळाले तरी नोकरी मिळत नाही व गरिबी असल्यामुळे जीवन व्यवस्थित जगता येत नाही , त्यामुळे गुन्हेगारी व अत्याचाराचे प्रमाण वाढते .

वरील सर्व कारणांमुळे आपल्याला स्वस्थ व सुरक्षित जीवन जगता येत नाही .  सर्वाधिक लोकसंख्येचे प्रथम पाच देश : चीन, भारत, अमेरिका, इंडोनेशिया, ब्राझील हे आहेत. चीनने ३१ मे २०२१ रोजी आपल्या लोकसंख्याविषयक धोरणात बदल केला. पूर्वीचं दोन अपत्यांच्या मर्यादेचं धोरण रद्द केलं आणि एका जोडप्याला तीन अपत्यांची परवानगी दिली .

 भारत आणि लोकसंख्या धोरण :

  जगात सर्वप्रथम कुटुंबनियोजनाचा कार्यक्रम सुरू करणारा देश म्हणजे भारत . १९५२ मध्ये भारतामध्ये कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम सुरू करण्यात आला . आत्तापर्यंत भारताची दोन लोकसंख्या धोरणे जाहीर करण्यात आली होती .

  पहिले राष्ट्रीय लोकसंख्या धोरण-१९७६ :

   लग्नाचे किमान वय स्त्रियांसाठी १८ वर्षे आणि पुरुषांसाठी २१ वर्षे करण्याची घोषणा . कुपोषण कमी करणे व स्त्री साक्षरता वाढवणे यावर भर . कुटुंब नियोजनासाठी वित्तीय मदत देण्याचा निर्णय . लोकसंख्येची मूल्य रुजवण्याचा लहान कुटुंबाच्या तत्त्वाचा प्रसार करण्यात आला .

 दुसरे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण २००० :

तातडीचे उद्दिष्ट : संततिनियमन, आरोग्य पायाभूत सुविधा, आरोग्य सेवकांची गरज भागविणे, आणि प्रजनन व बाल आरोग्य सेवा मिळविण्यासाठी एकात्मिक सेवा पुरविणे.

मध्यवर्ती उद्दिष्ट : २०१० पर्यंत एकूण जननदर (TFR) पुन:स्थापनेच्या स्तरावर म्हणजेच २.१ वर आणणे व यासाठी धोरणात्मक अंमलबजावणी करणे. म्हणजेच एका जोडप्यामागे दोन मुले ( हम दो, हमारे दो ) या तत्त्वाचा प्रसार करणे .

  दीर्घकालीन उद्दिष्ट :  २०४५ पर्यंत लोकसंख्या स्थिरीकरण करणे. ती अशा स्तरावर स्थिर करणे जिथे शाश्वत विकास शाश्वत आर्थिक वाढ व सामाजिक विकास होईल आणि पर्यावरण सुरक्षित राहील . लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवणे ही सामूहिक जबाबदारी आहे .

लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कायद्यापेक्षा प्रत्येकाने वैयक्तिक योगदान दिले आणि सीमित कुटुंब ठेवले तर जीवनमानाचा स्तर उंचावेल आणि जगात भारत आर्थिकदृष्ट्या सुद्धा जगात प्रथम क्रमांक पटकावेल यात दुमत नसावे .

संकलन : चंद्रकांत शेळके, तहसीलदार , ता.अंबड ,जि जालना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here