अनंतनागमध्ये जवानांचा ड्रोन बाँबहल्ला; दहशतवादी धूम ठोकून पळाला..

0

विशेष प्रतिधी
अनंतनाग – जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारतीय जवानांनी ड्रोन बॉम्बहल्ला केला आहे. यावेळी एक दहशतवादी कोकरनागच्या जंगलात पळताना दिसला. याचा व्हिडिओ इंडिया टुडे या वृत्तसंस्थेकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे.
जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत देशाचे मोठे नुकसान झाले आहे. या चकमकीत कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष धोनचक, आणि जम्मू-काश्मीरचे उपअधीक्षक हुमायून भट आणि एक जवान शहीद झाले आहे. त्यानंतर भारतीय जवानांनी दहशतवाद्यांची शोध मोहीम सुरू केली आहे.
जम्मु काश्मिरमधील अनंतनागच्या कोकरनाग जंगलात दहशतवाद्यांशी सुरू असलेल्या चकमकीत भारतीय जवानांना घनदाट जंगलामुळे त्याच्यावर अचुक हल्ला करणे अवघड जात आहे. पण दहशतवाद्यांना शोधुन त्यांचा खात्मा करण्यासाठी शोध मोहिम सुरू केली आहे. पोलिस दलापासून पॅरा कमांडोपर्यंत दहशवाद्यांविरोधात कारवाईचा धडाका सुरू आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here