नवि दिल्ली : कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी त्यांच्या संसदेत भारतावर केलेल्या गंभीर आरोपानंतर आता दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. जस्टीन ट्रुडो यांनी कॅनडातील खलिस्तानी दहशतवाद्याच्या हत्या प्रकरणात भारताचा हात असल्याचा आरोप केला होता.
यानंतर भारतीय राजदूतावर निलंबनाची कारवाईसुद्धा केली गेली. दरम्यान, याला आता भारताने जशास तसे उत्तर दिले आहे. भारताने कॅनडाचे आरोप फेटाळून लावले असून भारतातील कॅनडाच्या उच्चायुक्तांना नोटीस पाठवली आहे. तसंच भारतातील कॅनडाच्या एका वरिष्ठ राजदूताला निलंबित करत पाच दिवसात भारत सोडण्यास सांगितलं आहे.परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडाला सुनावताना म्हटलं की, आमच्या अंतर्गत प्रकरणात राजदूतांचा हस्तक्षेप आणि भारतविरोधा कारवायांमध्ये त्यांच्या सहभागामुळे भारत सरकारला चिंता वाटते.
परराष्ट्र मंत्रालयाने जस्टीन ट्रुडो यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. भारत कॅनडाचे सर्व आरोप नाकारत आहे. आम्ही त्यांच्या संसदेत पंतप्रधानांचे वक्तव्य पाहिले आणि परराष्ट्र मंत्र्यांचे वक्तव्यही फेटाळून लावले आहे. कॅनडात हिंसाचाराच्या कोणत्याही घटनेत भारत सरकारचा भाग असल्याचे आरोप हे बिनबुडाचे आहेत असं भारताने म्हटलं.Punjab : काँग्रेस नेत्याची घरात घुसून हत्या, कॅनडातील दहशतवाद्याने घेतली जबाबदारी; VIRALखलिस्तानी टायगर फोर्सचा प्रमुख हरदीप सिंह निज्जर याची कॅनडात हत्या झाली होती. या प्रकरणाशी भारताचे कनेक्शन असल्याचा आरोप करत कॅनडाने सोमवारी भारताच्या एका वरिष्ठ राजदूतावर निलंबनाची कारवाई केली होती. कॅनडाच्या पराराष्ट्र मंत्र्यांनी आरोप केला होता की, भारताचे वरिष्ठ राजदूतांचा खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्या प्रकरणाशी संबंध होता. यावर पंतप्रधान ट्रुडो यांनीही चिंता व्यक्त केली होती.