नवी दिल्ली : कतारमध्ये अटक करण्यात आलेल्या आठ भारतीय नौदलाच्या ८ निवृत्त अधिकाऱ्यांना कतारच्या न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्याने देशामध्ये एकाच खळबळ उडाली आहे. सप्टेंबर 2022 मध्ये, कतार सरकारनं 8 माजी भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांना अटक केली होती . मार्चमध्ये त्यांच्यावर हेरगिरीचे आरोप ठेवण्यात आले होते.अटक करण्यात आलेले 8 भारतीय नागरिक माजी नौदलाचे अधिकारी असून ते कतार मधील झाहिरा अल आलमी नावाच्या कंपनीत काम करत होते. ही कंपनी कतार नौदलासाठीच्या पाणबुडी योजनेसाठी काम करत होती. रडारला टाळू शकणार्या हायटेक इटालियन तंत्रज्ञानावर आधारित पाणबुड्या घेणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता. कंपनीत 75 भारतीय नागरिक कर्मचारी होते. त्यापैकी बहुतांश भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी होते.
गेल्या काही महिन्यांपासून या माजी अधिकाऱ्यांची सुटका करण्यासाठी भारत सरकारवर खूप दबाव होता आणि भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं ही बाब त्यांच्या ‘सर्वोच्च प्राधान्य’ असल्याचं सांगितलं होतं. गेल्या जूनमध्ये अटक करण्यात आलेल्या एका निवृत्त नौदल अधिकाऱ्यांची बहीण मीतू भार्गव यांनी आपल्या भावाला परत आणण्यासाठी सरकारकडे मदत मागितली होती.
हे आठही भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी असून गेल्या वर्षी ऑगस्टपासून ते कतारच्या तुरुंगात आहेत. कतारनं त्यांच्यावरील आरोप सार्वजनिक केलेले नाहीत.भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे की, “अल दाहरा कंपनीच्या आठ भारतीय कर्मचाऱ्यांशी संबंधित खटल्यात कतारच्या न्यायालयानं आपला निर्णय दिला असल्याची प्राथमिक माहिती आमच्याकडे आहे.”भारतीय परराष्ट्र खात्यानं पुढे म्हटलंय की, “फाशीच्या निर्णयामुळे आम्हाला धक्का बसला असून सविस्तर निकालाची वाट पाहत आहोत. आम्ही त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि कायदेविषयक टीमच्या संपर्कात आहोत. आम्ही या प्रकरणाकडे सर्वोच्च प्राधान्याने पाहत आहोत आणि हे प्रकरण कतारच्या अधिकाऱ्यांसमोर मांडणार आहोत.” या प्रकरणात अधिक भाष्य करू शकत नाही, असंही परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.
या निवृत्त नौदल अधिकाऱ्यांवर कतारच्या अत्यंत प्रगत इटालियन पाणबुड्या खरेदी करण्यासंबंधीच्या गुप्तचर कार्यक्रमाविषयी इस्रायलला माहिती पुरवल्याचा आरोप आहे. म्हणजे या निवृत्त भारतीय नौदल अधिकाऱ्यांवर इस्रायलसाठी हेरगिरी केल्याचा आरोप कतार सरकारने केला आहे .