जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत ६ दहशतवाद्यांचा खात्मा ; दोन जवानही शहीद

0

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत 6 दहशतवादी ठार झाले आहेत.

या प्रकरणात स्थानिक कट्टरतावादी सहभागी असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महासंचालक आरआर स्वेन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “दोन वेगवेगळ्या ठिकाणी चकमक झाली आहे, ज्यामध्ये मृतदेहांच्या पुष्टीनुसार, 6 अतिरेकी मारले गेल्याची माहिती आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हे अत्यंत महत्त्वाचे आहे. सध्या हे ऑपरेशन सुरू असून, हे ऑपरेशन संपल्यानंतर अधिक माहिती दिली जाऊ शकते.” स्वेन म्हणाले की, “आम्ही प्रत्येक घटनेला गांभिर्याने घेतो. जम्मू भागातील जुनी परिस्थिती पुन्हा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.”

 

या गोळीबारात एक जवान जखमी झाला. या गोळीबारादरम्यान सुरक्षा चौकीवर तैनात असलेल्या जवानांनी दहशतवाद्यांवर गोळीबार केला. आज पहाटे 3.50 वाजता ही घटना घडली. अंधाराचा फायदा घेत दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाले. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी लष्कर आणि पोलिसांनी परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे. याबाबत लष्कराकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here