नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा घेतली पंतप्रधान पदाची शपथ

0

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांनी रविवारी सायंकाळी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. एनडीए आघाडीनं लोकसभा निवडणुकीत 293 जागा मिळवत सत्ता स्थापन केली आहे. तर भाजपला स्वबळावर 240 जागा मिळवण्यात यश आलं आहे. नितीन गडकरी, अमित शाह, जेपी नड्डा यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली.  गजेंद्र सिंह शेखावत,अन्नपूर्णा देवी,ज्योतिरादित्य शिंदे,गिरीराज सिंह, मागील सरकारमधील रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव,प्रल्हाद जोशी,सर्वानंद सोनोवाल, रक्षा खडसे,मुरलीधर मोहळ यांनीही शपथ घेतली .

शपथविधी सोहळ्यात मान्यवरांसह सेलिब्रिटींची उपस्थिती

राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात होणाऱ्या एनडीए सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी देश विदेशातील सेलिब्रिटींची उपस्थिती पाहायला मिळाली. यावेळी सार्क देशांच्या राष्ट्रप्रमुखांसह शाहरूख खान, रजनिकांत, मुकेश अंबानी, गौतम अदानी, अक्षय कुमार यांचाही उपस्थितांमध्ये समावेश आहे.

मोदींच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा समावेश नाही : भाजप नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीला (अजित पवार गट) एक राज्य मंत्रिपद घेण्याची ऑफर मिळाली होती. पण त्यांनी ती ऑफर फेटाळली. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने यास दुजोरा देताना म्हटले आहे की प्रफुल्ल पटेल यांचा मंत्रिमंडळात सामावेश होणार होता मात्र भाजपने राज्यमंत्री पदाची ऑफर केली होती . तर परंतु पटेल यांनी यापूर्वी कॅबिनेट मंत्री पदी काम केले असल्याने राज्यमंत्री पदाऐवजी कॅबिनेट मंत्रीपदाची मागणी केली होती . मात्र भाजपकडून हि मागणी फेटाळण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात एक कॅबिनेट मंत्रिपद मिळायला हवं होतं, असं म्हटलं आहे.एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना अजित पवार म्हणाले की, “प्रफुल्ल पटेल आधी कॅबिनेट मंत्री होते. आम्हाला केंद्र सरकारमध्ये राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार) पद घेणं योग्य वाटलं नाही. आम्ही भाजपला म्हटलं की, आम्ही वाट पाहायला तयार आहोत, पण आम्हाला कॅबिनेट मंत्रिपदच हवं आहे. “

“लोकसभेत आमचा एक खासदार आहे. राज्यसभेतही आमचा एक खासदार आहे. पुढच्या दोन ते तीन महिन्यात राज्यसभेत आमचे आणखी तीन खासदार असतील. त्यामुळं संसदेत आमचे चार खासदार होतील. चार खासदार असल्यानं आम्हाला एक कॅबिनेट मंत्रिपद मिळायला हवे.”

लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला फक्त एका जागेवर विजय मिळवता आला होता. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागांपैकी एनडीए आघाडीला 17 जागांवरच विजय मिळाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here