न्यूझीलंडच्या महिला खासदाराने हँडबॅग चोरल्याचे उघड ; द्यावा लागला राजीनामा

0

ऑकलंड : दुकानांमधून हँडबॅग चोरी केल्याच्या आरोपांमुळे न्यूझीलंडच्या एका खासदारांना राजीनामा द्यावा लागला आहे. या आरोपांचा तपास पोलीस करत आहेत. गोलरिझ घाहरमन असं त्यांचं नाव असून त्या ग्रीन पार्टीच्या खासदार आहेत. त्यांनी ऑकलंड आणि वेलिंग्टनमधील दोन दुकानांतून तब्बल तीन वेळा चोरी केली असा त्यांच्यावर आरोप आहे.

संयुक्त राष्ट्रात मानवाधिकार वकील म्हणून पूर्वी कार्यरत असणाऱ्या गोलरिझ 2017 साली खासदार झाल्या. न्यूझीलंड सरकारमधील त्या पहिला निर्वासित समुदायातील मंत्री आहेत. त्यांच्याकडे पक्षाच्या न्यायविभागाचा पदभारही होता. कामाच्या ताणामुळे आपल्याला असं विचित्र वागावं लागलं,’ असं त्या सांगतात. ‘मी अनेक लोकांना निराश केलं असून मला दुःख झालं आहे,’ असं त्या म्हणाल्या.

गोलरिझ लहान असताना आपल्या कुटुंबासह इराणमधून बाहेर पडल्या. त्यांनी न्यूझीलंडमध्ये राजकीय आश्रय घेतला. ऑकलंडमधील एका दुकानातून हँडबॅग चोरत असल्याचं सीसीटीव्ही चित्रिकरण प्रसिद्ध झाल्यावर मंगळवार 16 जानेवारी रोजी त्यांनी राजीनामा दिला.”निर्वाचित प्रतिनिधींनी सार्वजनिक ठिकाणी कसं वागायचे याचे उच्च मापदंड असतात ते पूर्ण करण्यास माझ्या कृतीमुळे मी कमी पडले,” असं त्यांनी जाहीर केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

“मी त्या कृतीबद्दल स्पष्टीकरण देऊ शकत नाही कारण ते वागणं अतार्किकच आहे. वैद्यकीय तपासणीनंतर माझी तब्येत ठीक नसल्याचं माझ्या लक्षात आलेलं आहे. अर्थात आपल्या कृतीसाठीचं हे कारण नाही,” असंही त्यांनी सांगितलं. मी ज्यांच्याकडे मानसिक आरोग्यासाठी मदत घेत आहे, त्यांच्या माहितीनुसार माझं सध्याचं वागणं हे ताणामुळे आणि पूर्वीच्या एखाद्या धक्क्यामुळे असावं. अलीकडच्या काळात त्यांच्यावर पॅलेस्टाइनला पाठिंबा देणाऱ्या आंदोलनांत सहभागी झाल्याबद्दल टीका झाली होती.

या राजीनाम्याबद्दल बोलताना ग्रीन पार्टीचे नेते जेम्स शॉ म्हणाले, “गोलरिझ यांची संसदेत निवड झाल्यापासून त्यांना लैंगिक हिंसा, शारीरिक हिंसा तसेच हत्येच्या धमक्या येत आहेत. इतर खासदारांना असलेल्या ताणापेक्षा त्यांना या सर्व गोष्टीमुळे जास्त ताण आला.””त्या संसदेत असल्यापासूनच्या आतापर्यंतच्या काळात नेहमीच सतत पोलीस तपासही सुरू राहिला. त्यामुळे अशा धमक्यांचा ताण आणि व तो ताण याची परिणती या कृतीत झाली,” जेम्स शॉ म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here