पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर

0

नवी दिल्ली ; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात कुणाला कोणते खाते दिले हे स्पष्ट करण्यात आले आहे.

राजनाथ सिंह यांच्याकडे संरक्षण खाते आहे, अमित शाह यांना गृह मंत्रालय आणि सहकार खाते देण्यात आले आहे. निर्मला सीतारामन या पुन्हा एकदा अर्थ मंत्री झाल्या आहेत. नितीन गडकरी यांच्याकडे रस्ते वाहतूक खाते आहे. एस. जयशंकर हे पुन्हा परराष्ट्र मंत्री बनले आहेत. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे कृषी आणि ग्रामविकास खाते आहे. भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना आरोग्य आणि केमिकल्स, खते ही दोन खाती आहेत.

या नव्या सरकारचा शपथविधी 9 जून 2024 रोजी पार पडला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. एकूण 71 जणांना नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. महाराष्ट्रातून नितीन गडकरी, पियुष गोयल, रामदास आठवले, रक्षा खडसे, प्रतापराव जाधव आणि मुरलीधर मोहोळ यांना मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळालंय.

कॅबिनेट मंत्री

क्रमांक

नाव

पक्ष

पदभार

1

राजनाथ सिंह

भाजप

संरक्षण

2

अमित शाह

भाजप

गृह, सहकार

3

नितीन गडकरी

भाजप

परिवहन, महामार्ग

4

जे पी नड्डा

भाजप

आरोग्य, कुटुंब कल्याण, खते आणि रसायन

5

शिवराज सिंह चौहान

भाजप

कृषी, शेतकरी कल्याण, ग्राम विकास

6

निर्मला सीतारामन

भाजप

अर्थ आणि कॉर्पोरेट अफेयर्स

7

डॉ एस जयशंकर

भाजप

परराष्ट्र व्यवहार

8

मनोहर लाल खट्टर

भाजप

गृृहनिर्माण, नगरविकास आणि ऊर्जा

9

पियुष गोयल

भाजप

वाणिज्य आणि उद्योग

10

धर्मेंद्र प्रधान

भाजप

शिक्षण

11

सर्वानंद सोनोवाल

भाजप

बंदरे, जहाजबांधणी, जलमार्ग

12

डॉ वीरेन्द्र कुमार

भाजप

समाजकल्याण आणि सामाजिक न्याय

13

प्रल्हाद जोशी

भाजप

ग्राहक, अन्नधान्य सार्वजनिक वितरण, नवीन आणि आपारंपरिक ऊर्जा

14

जुएल ओराम

भाजप

आदिवासी

15

गिरिराज सिंह

भाजप

वस्त्रोद्योग

16

अश्विनी वैष्णव

भाजप

रेल्वे, माहिती व प्रसारण, इलेक्टॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान

17

ज्योतिरादित्य सिंधिया

भाजप

दूरसंचार, ईशान्य विकास

18

भूपेंद्र यादव

भाजप

पर्यावरण, वने आणि हवामान बदल

19

गजेंद्र सिंह शेखावत

भाजप

सांस्कृतिक कार्य, पर्यटन

20

अन्नपूर्णा देवी

भाजप

महिला व बालकल्याण

21

किरण रिजिजू

भाजप

संसदीय कार्य आणि अल्पसंख्याक

22

हरदीप सिंह पुरी

भाजप

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू

23

डॉ मनसुख मांडविया

भाजप

कमगार आणि रोजगार, क्रीडा आणि युवा कल्याण

24

जी किशन रेड्डी

भाजप

कोळशा आणि खाण

25

सी आर पाटील

भाजप

जलशक्ती

26

एच डी कुमारस्वामी

जनता दल (सेक्युलर)

अवजड उद्योग आणि स्टील

27

राम मोहन नायडू

तेलगू देसम पार्टी

नागरी उड्डाण

28

चिराग पासवान

लोक जनशक्ती पार्टी

अन्नप्रक्रिया उद्योग

29 )जितन राम मांझी हिंदुस्तानी आवाम मोर्चा सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग

30) राजीव रंजन सिंहजनता दल (युनायटेड)पंचायती राज, मत्स्य, पशूसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here