बृजभूषण सिंह यांच्याविरोधात सुरू असलेला तपास 15 जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश

0

महिला कुस्तीपटूंवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्याविरोधात सुरू असलेला तपास 15 जूनपर्यंत पूर्ण करण्यात यावा, असे आदेश क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिले आहेत.

नवी दिल्लीत आंदोलन करत असलेल्या कुस्तीपटूंनी आज क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांची भेट घेतली. या बैठकीत कुस्तीपटूंच्या मागण्यांवर निर्णय घेण्यात आले. याबाबत माहिती देताना अनुराग ठाकूर बोलत होते.

या बैठकीसाठी बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि शेतकरी नेते राकेश टिकैत हे क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या निवासस्थानी गेले होते.

ही बैठक सुमारे पाच तास चालली. बैठकीनंतर ठाकूर म्हणाले, “या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. तपास पूर्ण करून आरोपपत्र दाखल करण्याबाबत आम्ही चर्चा केली. हे आम्ही करणार आहोत.”

ठाकूर यांनी या बैठकीत कुस्तीपटूंनी मांडलेल्या मागण्या आणि त्यावर झालेल्या निर्णयाबाबत सर्वांना माहिती दिली ती खालील प्रमाणे – •15जूनपर्यंत तपास पूर्ण करून चार्जशीट दाखल व्हावी•WFIची Internal Complaint Committee स्थापन व्हावी, एक महिला तिची अध्यक्ष व्हावी•30 जूनपर्यंत WFIची निवडणूक घ्यावी •निवडणूक होइस्तोवर IOAच्या Ad Hoc समितीत दोन महिला कोचेसचा समावेश करण्याचा सल्ला•निवडणूक कुठल्याही दडपणाशिवाय पार पडावी•बृजभूषण यांच्या तीन टर्म पूर्ण, ते आणि त्यांचे निकटवर्तीय निवडून येऊ नये, अशी मागणी•महिला खेळाडूंसह इतर कुस्तीपटूंना आवश्यकतेनुसार सुरक्षा व्यवस्था•ज्या आखाड्यांच्या खेळाडूंवर आणि कोचेसवर गुन्हे दाखल झाले आहेत, ते मागे घेतले जावेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here