महिला आरक्षणाला कॅबिनेटमध्ये मंजुरी

0

‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ विधेयकाला नाव

महिला आरक्षणाला केंद्रीय मंत्रिमंडळात मंजुरी देण्यात आल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलीय.मोदी म्हणाले की, “अनेक वर्षांपासून महिला आरक्षणावर वाद सुरु आहेत. याच्या आधी काही प्रयत्न झाले. 1996 मध्ये पहिल्यांदा हे विधेयक आणले गेले. अटलजींच्या काळात तर कित्येकवेळा हा प्रयत्न झाला. पण ते आकडे जमवू शकले नाहीत. त्यामुळे त्यांचं स्वप्न अधुरं राहिलं. पण अशा अनेक पवित्र कामांसाठी कदाचित परमेश्वरानं माझी निवड केली आहे.”

‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ असं महिला आरक्षणाच्या कायद्याचं नाव असेल. विधानसभा आणि लोकसभेत महिलांना आरक्षण दिलं जाईल.

नरेंद्र मोदींच्या सेंट्रल हॉलमधील भाषणातील मुद्दे –

  • हे सेंट्रल हॉल आपल्या भावनांनी भरलंय.
  • हा हॉल पूर्वी ग्रंथालयासारखा वापरला जात असे. मग संविधान सभा इथे होऊ लागली.
  • इथेच 1947 साली ब्रिटिशांकडून सत्ता आपण मिळवली. त्या प्रक्रियेचा हा हॉल साक्षीदार आहे.
  • याच सेंट्रल हॉलमध्ये भारताच्या राष्ट्रगीताचा स्वीकार झाला.
  • 1952 नंतर जगातल्या जवळपास 41 राष्ट्राध्यक्षांनी या सेंट्रल हॉलमध्ये आपल्या खासदारांना संबोधित केलंय.
  • राष्ट्रपती महोदयांनी 86 वेळा इथे संबोधन केलं गेलंय.
  • अनेक संशोधनं, अनेक सुधारणांचा साक्षीदार आपली संसद राहिलीय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here