थायलंड नौदलाचं एक जहाज रविवारी रात्री थायलंडच्या आखातात आलेल्या वादळात बुडालं असून यावर सुमारे 100 खलाशी होते.
अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, सोमवारी एचटीएमएएस सुखोथाय नावाचं जहाज बुडालं असून यावर असणारे 28 खलाशी अजूनही बेपत्ता आहेत.
यात कोणतीही जीवितहानी झालेली नसून, तीन क्रू मेंबर्सची प्रकृती मात्र गंभीर आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, पाण्यावर तरंगत असलेलं जहाज वादळामुळे पाण्याखाली गेलं आणि उसळी मारून पुन्हा पाण्यावर आलं. यात पाण्यामुळे पॉवर रूममध्ये शॉर्ट सर्किट झाले. पॉवर रूममध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे, नौदलाचं जहाजावरील नियंत्रण हरवलं. स्थानिक वेळेनुसार रविवारी (16:30 GMT) 23:30 च्या सुमारास जहाजाला जलसमाधी मिळाली.
पॉवर रूममध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे, नौदलाचं जहाजावरील नियंत्रण हरवलं. स्थानिक वेळेनुसार रविवारी (16:30 GMT) 23:30 च्या सुमारास जहाजाला जलसमाधी मिळाली. हे जहाज रविवारी प्रचुआप खीरी खान प्रांतातील बंग सफान जिल्ह्याच्या किनारपट्टीपासून फक्त 32 किमी (20 मैल) पाण्यात गस्तीवर होतं. थाय नेव्हीच्या ट्विटर अकाऊंटद्वारे या जहाजाचे फोटो पोस्ट करण्यात आले आहेत. या फोटोत हरवलेल्या खलाशांची शोधमोहीम राबवली जातानाचे काही फोटो आहेत.
या जहाजाच्या मदतीसाठी तीन नौदल जहाजं आणि हेलिकॉप्टर पाठवण्यात आले होते. हे जहाज बुडताना दिसल्यावर एचटीएमएएस क्राबुरी तिथं पोहोचलं आणि जहाजावर असलेल्या 106 खलाशांपैकी 78 जणांना वाचवण्यात यश आलं.
अजूनही 28 खलाशी जहाजावर अडकले असून, त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचं नौदलाने सांगितलं. नौदलाने, 106 पैकी 28 जण अजूनही सापडले नसल्याचं सोमवारी प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात म्हटलं होतं. हे 28 जण आता सापडले आहेत का याबाबत काहीच माहिती मिळालेली नाही. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, रात्रभर सर्व क्रु मेम्बर्सचा शोध सुरू होता. स्थानिक माध्यमांनी काही फोटो प्रसिद्ध केले होते, यात डॉकवरील वैद्यकीय कर्मचारी क्रू मेंबर्सला स्ट्रेचरवरून नेत असल्याचं दिसतंय.