वाहतुकदारांचा संप अखेर मागे !

0

इंधनाअभावी चाके थांबली, सर्व सामान्यांचे प्रचंड हाल…

नवी दिल्ली, : तीन नव्या फौजदारी कायद्यांविरोधात संपावर गेलेल्या वाहतूकदारांचा केंद्र सरकारशी अखेर समेट झाली आहे. नवीन कायद्यातील हिट अँड रनसाठी कठोर शिक्षेला वाहनचालक आणि वाहतूकदार विरोध करत आहेत. आज सायंकाळी केंद्र सरकारसोबत झालेल्या बैठकीनंतर सध्या त्यांची अंमलबजावणी न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.4ई गृह सचिव अजय भल्ला यांनी सांगितले की, हिट अँड रनचे नियम अद्याप लागू होणार नाहीत. वाहनचालकांना कामावर परतण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 10 वर्षे कारावास आणि दंडाचा नियम अद्याप लागू होणार नाही.

काय आहे नवीन कायदा?
भारतीय न्यायिक संहितेत हिट अँड रन हा कायदा बनला आहे. आगामी काळात, त्याच्या नवीन तरतुदी भारतीय दंड संहितेच्या (IPC) जुन्या तरतुदींची जागा घेतील. मात्र यावरुन आता गदारोळ सुरू सुरू झाला आहे. नवीन तरतुदीनुसार, रस्ता अपघातात एखाद्याचा मृत्यू झाल्यास आणि वाहन चालकाने घटनास्थळावरून पळ काढल्यास त्याला 10 वर्षांची शिक्षा होऊ शकते आणि दंडही भरावा लागणार आहे.

यापूर्वी 2 वर्षांची शिक्षा होती देशभरातील अनेक राज्यांमध्ये याविरोधात ट्रकचालक आंदोलन करत आहेत. केवळ ट्रकचालकच नाही तर बस, टॅक्सी, ऑटोचालकही याला विरोध करत आहेत. कारण नवीन कायदे खाजगी वाहन चालकांनाही तितकेच लागू होणार आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here