दिग्गज टेक कंपनी ‘गुगल’ला सर्वोच्च न्यायालयाकडून झटका बसला आहे. भारतीय स्पर्धा आयोगाने (सीसीआय) गुगलला ठोठावलेल्या 1338 कोटी रुपयांच्या दंडाला स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला.
मात्र, न्यायालयाने सीसीआयच्या आदेशाचं पालन करण्यासाठी गुगलला आणखी एका आठवड्याने मुदत वाढवून दिली आहे.
गुगलने युरोप आणि भारतासाठी वेगवेगळे धोरण स्वीकारल्याचे केंद्र सरकारने म्हटलं होतं. युरोपमध्ये अशाच एका प्रकरणात गुगलने 4 अब्ज युरोचा दंड भरला आहे.
भारतात मात्र दंडाच्या निर्णयाला या कंपनीने आव्हान दिलं आहे. न्या. चंद्रचूड यांनी, गुगलला दंड करण्याचा संबंधित आदेश 20 ऑक्टोबर 2022 रोजी काढण्यात आला होता असे नमूद करून या कंपनीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.