आत्मा नाशिक यांचे राज्यांतर्गत शेतकरी अभ्यास दौऱ्याचे आयोजन

0

येवला प्रतिनिधी 

महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, आत्मा नाशिक यांचे मार्फत आत्मा अंतर्गत राज्यांतर्गत  शेतकरी अभ्यास दौ-याचे आयोजन येवला व नांदगाव प्रति तालुका 25 शेतकरी प्रमाणे 50  शेतकऱ्यांचे एकत्रित नियोजन तालुका फळ रोपवाटिका येवला येथुन करण्यात आले होते.सदर अभ्यास दौ-याचे उद्घाटन शुभम बेरड , तालुका कृषी अधिकारी येवला यांच्या हस्ते करण्यात आले.

सदर अभ्यास दौ-याचे आयोजन हे ऍग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचालित कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे दि.16जानेवारी ते 20 जानेवारी 2025 या कालावधीत आयोजीत कृषिक 2025 भव्य कृषी व पशु प्रदर्शनास शेतकऱ्यांना कृषी व कृषि संलग्न क्षेत्रातील नवीन कृत्रिम बुद्धिमत्तेचा कृषी क्षेत्रातील वापर या तंत्रज्ञानावर आधारित पिकावरील अद्यावत केलेले तंत्रज्ञानास भेट देण्यासाठी करण्यात आले होते. सदर प्रदर्शनात सुक्ष्म सिंचन पध्दतीने मल्चिंग पेपर वर लागवड केलेले फुलपिके, भाजीपाला पीके,मिरची, टोमॅटो,कांदा, मका,ऊस इत्यादी पिकांचे प्रात्यक्षिके आधारित कृत्रिम पध्दतीने अद्यावत केलेले तंत्रज्ञानाची पाहणी तसेच शेडनेट व पालीहाऊस मधील भाजीपाला पिके लागवड तंत्रज्ञानाची पाहणी करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.तसेच कृषि निविष्ठा बियाणे, किटकनाशके व खते उत्पादक कंपनी ,कृषि यांत्रिकीकरण, ट्रॅक्टरचलीत व मनुष्यचलीत औजारे उत्पादक कंपनी, अन्नप्रक्रिया मशिनरी स्टाॅलची पाहणी करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

तसेच महिला गटांचे प्रक्रिया युक्त केलेले उत्पादने स्टाॅलला भेट देऊन मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित शेतक-यांनी भेट दिलेल्या प्रदर्शनाचे अभिप्राय घेऊन अभ्यास दौरा कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.सदर अभ्यास दौरा यशस्वी होण्यासाठी येवला व नांदगाव तालुक्यातील कृषि विभागाचे कृषि सहायक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी यांनी परिश्रम घेतले.सदर अभ्यास दौ-यात समन्वयक म्हणून एस.टी.कर्नर, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक, नांदगाव व आर.डी.निंबाळकर, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक,येवला यांनी कामकाज पहिले.तसेच सदर शेतकरी अभ्यासदौ-याचे आयोजन अभिमन्यु काशीद,प्रकल्प संचालक आत्मा नाशिक व विलास सोनवणे ,उपप्रकल्प संचालक आत्मा, नाशिक जयंत गायकवाड उपविभागीय कृषि अधिकारी निफाड व. संदीप मेढे उपविभागीय कृषि अधिकारी मालेगाव शुभम बेरड तालुका कृषि अधिकारी येवला रवींद्र डमाळे तालुका कृषि अधिकारी नांदगाव यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here