माहूर तालुक्यास अवकाळी पाऊस व गारपिटीने झोडपले; शेतीचे व घरांचे प्रचंड नुकसान

0

खासदार हेमंत पाटील यांनी दिला नागरिकांना धीर
………………………………………………………………
माहूर :- माहूर तालुक्यास बुधवारी रात्री अवकाळी पाऊस, वादळी वारे व गारपिटीने अक्षरशा झोडपून काढले आहे. अचानक आलेल्या पावसामुळे व गारपिटीने शेतीतील उभ्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे तर शेकडो घरावरील टीन पत्रे वादळी वाऱ्यामुळे उडून गेले आहेत. वाऱ्याच्या प्रचंड वेगाने झाडे  पडली विद्युत वितरण कंपनीचे खांब जमिनीवर पडले आहेत.
                  माहूर तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून अवकाळी पावसाने कहर केला अवकाळी पाऊस व गारपिटीने तीळ,उन्हाळी ज्वारी,मका इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर ग्रामीण भागातील तीन पत्राची घरांचे मोठे नुकसान झाले तसेच अनेक जनावरे जखमी झाले आहेत.
   बुधवारी रात्री अवकाळी पावसामुळे व विजेच्या कडकडाटामुळे नागरिक भयभीत झाले होते मध्यरात्री जोरदार पाऊस व गारपिटीने तांडव घातले होते.
                        आज गुरुवारी हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील यांनी सहाय्यक जिल्हाधिकारी नेहा भोसले,तहसीलदार किशोर यादव, गटविकास अधिकारी सुरेश कांबळे, नगरपंचायत चे मुख्याधिकारी डॉक्टर राजकुमार राठोड, कृषी अधिकारी मंडळ अधिकारी ग्रामसेवक तलाठी यांच्यासह अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या रुई,सातघरी, लांजी आदी गावास भेट देऊन तेथील शेतीतील नुकसान झालेल्या पिकांची व पडझड झालेल्या घरांची पाहणी केली. शेतकऱ्यास व नागरिकांना धीर दिला व शासनाकडून योग्य ती आर्थिक मदत दिली जाईल असे आश्वासन दिले.
            सातघरी येथील सोनू बाई नंदू पवार या ६२ वर्षीय महिलेचा वादळी वाऱ्यामुळे घरावरील छत अंगावर कोसळल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली त्यामुळे कुटुंबास भेट देऊन घटनेची माहिती घेतली.गहू, हरभरा, ज्वारी, तीळ, भाजीपाला पिके जमीनदोस्त झाली आहे.
          माहुर तालुक्यातील,मुरली,लांजी, नखेगाव, आष्टा, टाकळी, कुपटी,इवलेश्र्वर,अनमाळ, पापलवाडी,शेकापुर, रुई,वडसा,पडसा, मदनापुर, हरडप, करळगाव,सायफल परिसरात अवकाळी पाऊस व गारपिठाने होत्या चे नव्हते झाले.शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने आता जगावे की मरावे अशा प्रतिक्रिया शेतकऱ्या कडून मिळत आहे.
                            यावेळी भाजपाने ते धरमसिंग राठोड, शिवसेनेचे हनुमंत मुंडे, संजय जोशी, विकास कपाटे, रुईचे माजी सरपंच निळकंठ मस्के,लांजी येथील सरपंच मारोती रेकुलवार, जनसंपर्क अधिकारी सुनील गरड यांच्यासह नागरिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here