हवालदिल तर कृषी मंत्री ,कृषी विभाग चढ्या भावाने कपाशी बियाणे ,खते विक्री करणाऱ्या दुकांदारावर कारवाई करणार का?
जालना प्रतिनिधी :
श्री क्षेत्र राजूर गणपती खरीप हंगाम सुरू होत असल्याने शेतकरी खाते ,बियाणे घेण्यास शेतकऱ्यांची राजूर मध्ये कृषी सेवा केंद्रावर गर्दी होऊ लागली आहे. अतिवृष्टी शेतकऱ्यांच्या मालाला भाव नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे.
त्यातच खरीप हंगामाच्या तोंडावर राजूर मध्ये कृषी सेवा केंद्रांवर कबड्डी ,संकेत , 7067 ही कपाशी बियाणे 1200 रुपये किंमतीने विक्री केली जात आहे. तसेच खताची पण चढ्या भावाने विक्री केली जात आहे. काही कीटकनाशकांवर शासनाने बंदी घेतली असताना काही कृषी केंद्रावर विक्री सुरू आहे.
कपाशी बियाणे व खाते चढ्या भावाने विक्री करणाऱ्या कृषी सेवा केंद्रावर कृषी विभाग कार्येवाही करणार की डोळ्याला पट्टी बांधून पाहत राहणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे? राजूर मध्ये खरीप हंगाम सुरू असताना खते ,कपाशी बियाणे चढ्या भावाने विक्री होत आहे.कृषी विभागाने आज पर्यंत एकही कृषी सेवा केंद्रावर धाड टाकलेली नाही .
राजूर मध्ये कृषी विभाग कृषी सेवा केंद्रावर चढ्या भावाने विक्री करणाऱ्या दुकांदारावर कार्येवाही होत नसल्याने शेतकरी वर्गातून प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. आता तरी कृषी विभागाला जाग येऊन कपाशी ,खते चढ्या भावाने विक्री करणाऱ्या कृषी सेवा केंद्र दुकांदारावर कार्येवाही करणार का? तसेच राज्याचे कृषी मंत्री सत्तार साहेब लक्ष देऊन कृषी सेवा केंद्रावर कपाशी , खते चढ्या भावाने विक्री करणाऱ्या दुकांदारावर कार्येवाही करून शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबवावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे