लंम्पी आजारावर वेळीच उपचार व लसीकरणाने नियंत्रण मिळू शकते -प्रा.डॉ.रविंद्र निमसे

0

नगर – शेती व्यवसायात नियोजन आणि कष्ट केल्यास नक्कीच चांगला फायदा होतो. शेतीबरोबरच पुरक व्यवसाय म्हणून पशु पालन केल्यास जोडधंदा म्हणूनही हातभार लागला जातो. सध्या Lumpy disease लंम्पी आजाराने जनावरांना ग्रासले आहे, वेळेच उपचार आणि लसीकरण केल्यास यावरही आपण नियंत्रण मिळू शकतो. चौकस आहाराने जनावरांची प्रतिकार शक्ती वाढून अनेक आजारांपासून दूर ठेवता येऊ शकते. शेतकर्‍यांना सर्वच स्तरावर मार्गदर्शन करण्यासाठी Mahatma Phule Agricultural University महात्मा फुले कृषी विद्यापीठ तसेच कृषी महाविद्यालये प्रयत्नशील आहेत. शासकीय योजनांचा लाभ शेतकर्‍यांनी घेऊन आपली प्रगती साधावी, असे आवाहन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे प्रा.डॉ.रविंद्र निमसे यांनी केले.

विळदघाट येथील डॉ.विखे पाटील कृषी महाविद्याच्यावतीने ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत नगर तालुक्यातील नांदगाव येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे प्रा.डॉ.रविंद्र निमसे, प्राचार्य डॉ.एम.बी.धोंडे, उपप्राचार्य एस.बी.राऊत, सरपंच सखाराम सरख, उपसरपंच नाथाभाऊ सरख, कृषि पर्यवेक्षक विजय सोमवंशी, सहा.सौ.कविता मदने, शामराव सोनवणे, विलास सोनवणे, मिनुभाऊ थोरात, कृषीरत्न सतीश सोनवणे, चेअरमन नंदकुमार सोनवणे आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी प्राचार्य डॉ.एम.बी.धोंडे म्हणाले, शेतकर्‍यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा व पाण्याचा योग्य वापर करुन शेतीचे उत्पन्न वाढवावे. बदलत्या हवामानाचा विचार करुन त्यादृष्टीने पिके घ्यावीत. माती परिक्षण, बी.बियाणे, खते, औषधे यांचा योग्य उपयोग केल्यास उत्पन्न नक्कीच वाढेल. याबाबत विखे पाटील कृषी महाविद्यालयाच्यावतीने आपणास मार्गदर्शन केले जाईल, असेही सांगितले.

     याप्रसंगी डॉ.एस.बी.राऊत यांनी पिकांसाठी लागणारे जैविक खते वापरण्याची योग्य पद्धत सांगून द्रवरुप व घनरुप जैनिक खतांबद्दल मार्गदर्शन केले. तसेच जैनिक खते या विषयी माहिती दिली.

     यावेळी सरपंच सखराम सरख यांनी विखे पाटील कृषी महाविद्यालयाच्यावतीने आमच्या गावातील शेतकर्‍यांना योग्य व तंत्रशुद्ध मार्गदर्शन केले आहे. अशा उपक्रमांचा शेतकर्‍यांना नक्कीच फायदा होईल. शेतकर्‍यांसाठीच्या योजनांचा ग्रामपंचयतीच्या माध्यमातून लाभ मिळवून देण्यासाठी नेहमीच प्रयत्न राहीला असल्याचे सांगितले.

     यावेळी विलास सोनवणे यांनी विखे पाटील कृषी महाविद्यालयातील कृषीकन्यांनी शेतकर्‍यांनी केलेल्या मार्गदर्शनाचे कौतुक केले. यावेळी प्रा.किरण दागडे, प्रा.बी.व्ही.गायकवाड, प्रा.पुनम ठोंबरे, विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषीकन्या शितल वाकडे हीने केले तर आभार वैष्णवी क्षीरसागर हीने मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here